राजुरा: वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या साहित्याचा, जीवनचरित्र्याचा अभ्यास व माहिती विषयक माहिती सर्व सामान्य माणसापर्यंत, पोहोचवावी या करीता नेहमी कार्यरत असणारी गुरुदेव सेवा मंडळ रामपूर, तसेच वाटचाल कुपोषण मुक्ती कडे या अभियाना मार्फत अनेक गावात कुपोषित मुलांना आहार किटचा वाटप करणारी संकल्प फाउंडेशन ही सामाजिक संस्था, या दोन्ही सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ग्रामजयंतीचे औचित्य साधुन वंदनीय तुकडोजी महाराजांच्या जीवन चरितत्र्यावर प्रश्न मंजुषा स्पर्धा रामपूर येथे घेण्यात आली. या स्पर्धसाठी दोन गट ठेवण्यात आले , प्रथम गट १०-१८ वय पर्यंत तर दुसरा गट १९ वर्षांपुढील ,या दोन्ही गटामधील युवक,युवती व रामपूर येथील नागरिकांनी भरघोस असा प्रतिसाद लाभला,. या स्पर्धेला यशस्वी करण्याकरिता श्री गुरुदेव सेवा मंडळ, रामपूरचे सेवाधिकारी श्री देविदास मालेकर ,सचिव प्रकाश उरकुंडे, कोषाध्यक्ष प्रा.राजेंद्र मालेकर, युवा प्रमुख निखिल गिरी, गजानन घुगुल, अनिल चौधरी , परशुराम साळवे, संकल्प फाउंडेशन सल्लागार उज्वल शेंडे,संस्थापक अध्यक्ष तथा प्रचारक गुरुदेव सेवा मंडळ रामपूर सूरज गव्हाणे, उत्पल गोरे,दीपक झाडे,सचिन क्षीरसागर, तसेच इतर दोन्ही संस्थेचे सदस्य यांनी मेहनत घेतली .
संकल्प फाउंडेशन व गुरुदेव सेवा मंडळ रामपूरने द्वारा आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धा… वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनचरित्र्यावर घेण्यात आली स्पर्धा; स्पर्धेला नागरिकांचा उत्स्पूर्थ प्रतिसाद
RELATED ARTICLES