Homeचंद्रपूरअंधारलेल्या वाटेवर प्रकाशरुपी "विजय' दिसताच वृद्ध आजी गहिवरल्या... माजी मंत्री वडेट्टीवारांच्या सहानुभुती...

अंधारलेल्या वाटेवर प्रकाशरुपी “विजय’ दिसताच वृद्ध आजी गहिवरल्या… माजी मंत्री वडेट्टीवारांच्या सहानुभुती पुढे आजींना अश्रू अनावर

 

देशात काँग्रेस पक्षाचे राष्ट्रिय नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो या ऐतिहासिक पदयात्रेचा नुकताच समारोप झाला. तर राष्ट्रीय नेत्याच्या त्याग व समर्पित भावनेने प्रेरित होऊन राज्यात काँग्रेस पक्षाने हाथ से हाथ जोडो या अभियानाला नववर्षाच्या पावन पर्वावर प्रचारसत्ताक दिनी सुरुवात केली. याच अभियाना अंतर्गत राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते तथा आ. विजय वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील पारडगाव येथून हाथ से हाथ जोडो अभियानाचा शुभारंभ केला. यादरम्यान पारडगाव गावातून निघालेल्या जनजागृती प्रभात फेरी दरम्यान दोन वृद्ध आजींनी आ. वडेट्टीवार यांना पाहून आयुष्याच्या उत्तरार्धातील समस्यांचा पाढा वाचला. यावर सहृदयी जनसेवक आ.वडेट्टीवार यांनी वृद्ध आजींच्या दुःखांवर फुंकर घालत नेत्र शस्त्रक्रिया व मोफत चष्मे देण्याचे वचन देताच दोघींचेही डोळे पाणावले. या विलक्षण प्रसंगाने उपस्थितांना सच्चा जनसेवक व मतदार यांच्यातील ऋणानुबंधाची प्रचिती अनुभवयास मिळाली.

 

पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता ते राज्याच्या कॅबिनेट मंत्री असा कोसोलांब व संघर्षमय प्रवास करणारे राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार हे राजकारणासह त्यांच्या जनसामान्यांप्रती असलेल्या सहृदयी संवेदनशीलता यामुळे ते उत्कृष्ट समाजकारणी तथा समाजसेवक म्हणून देखील ओळखले जातात. असाच एक प्रसंग ब्रह्मपुरी तालुक्यातील पारडगाव येथे काँग्रेस पक्षाच्या “हाथ से हाथ जोडो’ या अभियाना अंतर्गत सुरू असलेल्या जनजागृतीपर प्रभात फेरी दरम्यान दोन वृद्ध महिला व आ. वडेट्टीवार यांच्या भेटीत पहावयास मिळाला. ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस पक्षाच्या हात से हात जोडो या अभियानाचा शुभारंभ पारडगाव येथून करण्यात आला. यावेळी गावातील मुख्य रस्त्यांवरून जनजागृतीपर प्रभात फेरी सुरू होती. याच दरम्यान काठीचा आधार घेत दोन वृद्ध आजीबाईंनी माजी मंत्री आ. वडेट्टीवारांना मोठ्या मायेने हाक दिली. या हाकेला क्षणाचाही विलंब न लावता शेकडो नागरिकांचा सहभाग असलेली चक्क प्रभात फेरी थांबूवून आ. वडेट्टीवार यांनी “त्या’ दोन वृद्ध आजींकडे वळले. आणि आस्थेने त्यांची विचारपूस केली. यावर दोन्ही वृद्ध आजींनी आपल्या नेत्रदृष्टीची समस्या मांडून आयुष्याच्या उत्तरार्धात व्याधीग्रस्त दुर्बल शरीराच्या अनेक व्यथा मांडल्या. यावर आ. वडेट्टीवारांनी ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना तात्काळ बोलावून परिसरातील गावातील वयोवृद्धांसाठी मोफत नेत्र रोग निदान व शस्त्रक्रिया शिबिर तसेच आरोग्य शिबिर लावण्याचे निर्देश दिले. आ. वडेट्टीवारांचे ते बोल ऐकून त्या दोन्ही वयोवृद्ध आजींनी मोठ्या समाधानाने आ. वडेट्टीवारांच्या डोक्यावर मायेचा हात फिरवून आशीर्वाद देत पाणावलेल्या डोळ्यांतील अनावर झालेल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली.आज राजकारणाच्या गुंतागुंतीच्या भवंनडरामध्ये दीर्घकाळ व्यथित करूनही एक सामान्य कार्यकर्ता ते राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदापर्यंत पोहोचून ही आपल्या संघर्षमय भूतकाळाचा विसर न पडू देता माणुसकीच्या झऱ्याप्रमाणे दीनदुबळ्या, दुःखींच्या भावनांप्रती संवेदनशीलता बाळगुण त्यांची जीवनतृष्णा भागविणारा तळमळीचा सच्चा जनसेवक म्हणून माजी मंत्री आ. वडेट्टीवार व दोन वृद्ध आजी यांच्या भेटीदरम्यान घडलेला हा विलक्षण प्रसंग अनुभवताना उपस्थितांचे डोळेही पानावले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!