Homeचंद्रपूरआमचं सरकार सत्तेत येताच जुनी पेन्शन योजना मंजूर करणार - माजी मंत्री...

आमचं सरकार सत्तेत येताच जुनी पेन्शन योजना मंजूर करणार – माजी मंत्री वडेट्टीवार….राजुरा येथे शिक्षक आ. अडबालेंचा सत्कार सोहळा…

लोकशाहीच्या नितीमुल्यावर आघात करुन देशात सर्वांना जगण्याचा समान हक्क मिळवून देणाऱ्या पवित्र संविधानाला नामशेष करण्याचे षडयंत्र समाज विघातकप्रवृत्ती कडून रचले जात आहे. अशा प्रवृत्तींना थारा न देता देशात जनजागृतीसाठी हजारों किमी पायदळ प्रवासातून देश संघटित करू पाहणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांना साथ देऊन देशातील अराजकातेला समुळ नष्ट करून राज्य व केंद्रात सत्ता परिवर्तन करा. आणि सत्ता परिवर्तन झाली की जुनी पेन्शन योजना लागू करुन न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. असे प्रतिपादन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आ. विजय वडेट्टीवार यांनी केले.ते राजुरा येथे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ तथा राजुरा विधानसभा काँग्रेस च्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवनिर्वाचित शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या सत्कार सोहळा निमित्ताने उद्घाटक म्हणून बोलत होते.

आयोजीत सत्कार सोहळा कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष खा. बाळू धानोरकर, स्वागताध्यक्ष म्हणुन राजुरा आ. सुभाष धोटे, विधानपरीषद आ. अभिजित वंजारी, कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती शिक्षक मतदार संघाचे नवनिर्वाचित आ. सुधाकर अडबाले, तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघ अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, कृउबा समिति कोरपनाचे श्रीधरराव गोडे, वि. मा. शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष ठाकरे, उपाध्यक्ष श्रीहरी शेंडे, दादाजी लांडे, स्वामी येरोलवार , जी. म. स. बँक संचालक विजय बावणे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष शांतनू धोटे, गडचांदुर नगराध्यक्ष सविता टेकाम, गोंडपिपरी नगराध्यक्ष सविता कुळमेथे, काँग्रेस ता. अध्यक्ष तुकाराम झाडे, व अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते.
यापुढें मार्गदर्शनपर बोलतांना माजी मंत्री आ.वडेट्टीवार म्हणाले की, संपुर्ण जगाच्या इतिहासात ज्यांच्या पराक्रम व सतगुनी चारित्र्याची नोंद आहे.असे छत्रपति शिवाजी महाराज आपल्या राज्याच्या मातीत जन्मले हे आपले अहोभाग्यच. शिवबा राजांची लढाई अन्याया विरुद्ध होती. धर्माविरुद्ध नाहीं.आज धर्मा धर्मात विष पेरण्याचे काम सुरू आहे. या धर्मांधतेला थारा न देता सर्व धर्म समभाव धर्मनिरपेक्ष काँग्रेसला साथ देऊन पुनः देश उभरणीकरिता लढाईत सामील व्हा असे आवाहन करीत जिल्हयात एकजुटीने व निष्ठेने पक्ष कार्य जबाबदारीने पार पाडल्यास संपुर्ण जिल्हा काँग्रेसमय निश्चित होईल अशी आशा यावेळी माजी मंत्री तथा आ. वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. अडबालेंचा विजय हा भाजप गडाला खिंडार पाडणारा आहे असेही ते म्हणाले.तर कौरवा व शकुनी डावा प्रमाणे जनतेशी छल कपट करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना सत्तेतून बाहेर करा असे आवाहन खा. बाळू धानोरकर यांनी केले.
यानंतर नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे नवनिर्वाचित आ.सुधाकर अडबाले यांचा सामूहिक सत्कार करण्यात आला. धडाडीच्या नेतृत्वाला मतदारांनी संधी दिल्याने शिक्षकांच्या समस्या नक्कीच मार्गी लागतील व आ. सुधाकर अडबाले हे कसोटीवर खरे उतरतील असा विश्वास राष्ट्रीय ओबीसी महासंघ अध्यक्ष प्राचार्य बबनराव तायवाडे यांनी यावेळी व्यक्त केला. तद्वतच शिक्षक मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीने मिळविलेले यश हे सांघिक कामगिरीचे फलीत असल्याचे मत सत्कार सोहळा स्वागताध्यक्ष आ. सुभाष धोटे यांनी व्यक्त केले. तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष असेच घवघवीत यश संपादन करेल असा दृढ विश्वास विधान परिषदेचे आमदार अभिजित वंजारी यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती आमदार सुधाकर अडबाले म्हणाले की, माझा विजय हा माजी मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री सुनिल केदार यांनी घेतलेली “रिस्क’ व दाखविलेला विश्वास, खा. धानोरकर,, आ. सुभाष धोटे व डॉ.तायवाडे यांचे सहकार्य आणि निवडणुकीत एकवटलेली शिवशक्ती- भीमशक्ती व कार्यकर्ते यांची पराक्रमी कामगीरी याची पावती होय. कार्यक्रमाचे सू्रसंचालन आनंद चलाख, प्रास्ताविक राजेश डाहुले यांनी केले. आयोजित सत्कार सोहळा कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने उपस्थितती होती.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!