चंद्रपूर : निवासी डॉक्टर व सहाय्यक डॉक्टर यांना झालेल्या मारहाणीच्या विरोधात तसेच सतत मिळत असलेल्या जिवघेण्या धमक्यांच्या विरोधात निवासी डॉक्टरांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात आजपासून बेमुदत संप पुकारला आहे.काही महिन्यांपूर्वी एका रुग्णाचे उपचार जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू होते. सदर रुगांचे नातेवाईक नेहमीच धमकावून डॉक्टरांकडून रुग्णाचे उपचार करून घ्यायचे. सदर रुगाचा मृत्यू झाल्यानंतर १ फेब्रुवारी ला रुगाच्या नातेवाईकांनी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांना मारहाण केली. तसेच त्यांच्या निवासस्थाना पर्यंत पाठलाग केला.
या मारहाणी चा निषेध करण्यासाठी तसेच कॉलेज मधील आपातकालीन यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी आजपासून निवासी डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारला. यामध्ये प्रामुख्याने इतर वैद्यकीय महाविद्यालया प्रमाणे सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवणे, आपतकालीन विभागातील सायरन दुरुस्त करणे, बंद पडलेले इंटरकोम दुरुस्त करणे, रुग्णालयाच्या आवारात वेळवेळी पेट्रोलिंग करणे, डॉक्टरांच्या निवासस्थानी रस्त्यांचे विद्युतीकरण करणे, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी पास सिस्टीम सुरू करणे, सर्व निकामी सीसीटीव्ही सिस्टिम पुन्हा सुरू करणे या मागण्यांचा समावेश आहे.
दरम्यान या डॉक्टरांनी महिला काँग्रेस ग्रामीण च्या जिल्हाध्यक्ष नम्रता आचार्य ठेमस्कर यांच्याशी संपर्क साधला. यावेळी ठेमस्कर या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपस्थित झाल्या व त्यांनी या डॉक्टरांचे प्रश्न समजून घेतले व हे प्रश्न शासकीय यंत्रणेपर्यंत पोचवण्याचे आश्वासन या डॉक्टरांना दिले.
यावेळी मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर तेजस्विनी चौधरी, उपाध्यक्ष रोहित होरे, महासचिव डॉ. प्रशांत मगडुम, डॉक्टर ऋतुजा गंगरडे, डॉ. प्रियंका तलरेजा, डॉ. मंगल पाटील, डॉ. वृषभ जाधव, डॉ. सलेशा एन., डॉ.सुमेधा मेहानी, डॉ. सौरभ माने, डॉ. विष्णू एस, डॉ. नाहीद सय्यद, डॉ. मृणाल निखाडे, डॉ. शरद बुरुंगले, डॉ. अक्षय वाघमारे, सेवादल महिला काँग्रेस च्या अध्यक्ष लता बारापात्रे, काँग्रेस चे सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष मुन्ना तावाडे यांची उपस्थिती होती.






