Homeचंद्रपूरमहाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांच्या संपला चंद्रपुरातून देखील पाठिंबा, चंद्रपूरात केले आंदोलन महिला काँग्रेसने...

महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांच्या संपला चंद्रपुरातून देखील पाठिंबा, चंद्रपूरात केले आंदोलन महिला काँग्रेसने दिला पाठिंबा

चंद्रपुरातील निवासी डॉक्टरांनी केले आंदोलन

चंद्रपूर: आज संपूर्ण महाराष्ट्रातील ५ हजार निवासी डॉक्टर आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर गेले आहे. चंद्रपूरातील देखील एकून ३५ निवासी डॉक्टर यांनी सेंट्रल आणि स्टेट मार्ड ला पाठिंबा देण्यासाठी आज वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर इथे आज आंदोलन केले. रुगांची हेळसांड होऊ नये म्हणून यातील काही डॉक्टर अत्यावश्यक सेवेसाठी रुग्णालयात हजर होते तर इतरांनी आंदोलनात व संपात सहभाग घेतला.

या आंदोलनाच्या प्रमुख तीन मागण्या संबंधीचे निवेदन या निवासी डॉक्टरांनी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर अशोक नीतनवरे यांच्या मार्फत शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांना पाठवले.

या निवेदनातून निवासी डॉक्टरांनी तीन प्रमुख मागण्या समोर ठेवल्या. निवासी डॉक्टर राहत असलेल्या वसतिगृहाची स्थिती अत्यंत हलाखीची आहे त्याची तातडीने दखल घेण्यात येऊन निवासी डॉक्टरांना चांगल्या दर्जाचे वसतिगृह पुरवण्यात यावे. त्याचबरोबर १४३२ निवासी डॉक्टरांचे रिक्त पदाचा प्रश्न शासन दरबारी रखडत पडला आहे तो तातडीने सोडविला जावा. तसेच सहयोग व सहाय्यक प्रधायपकांची अपुरी पदे भरण्यात यावी जेणेकरून पदवीपूर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. या प्रमुख मागण्यांसाठी या निवासी डॉक्टरांनी आज आंदोलन केले व संप केला.

महिला काँग्रेस च्या जिल्हाध्यक्ष नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी देखील या संपावर असलेल्या आंदोलक डॉक्टरांची भेट घेतली व त्यांचे प्रश्न समजून घेतले. तसेच या डॉक्टरांना आपला पाठिंबा दिला. आपल्या पक्षाच्या आमदारांशी व खासदारांशी याबाबत बोलून सभागृहात हे प्रश्न लावण्याची विनंती करणार असल्याचे यावेळी नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी संगितले.

या आंदोलनाचे नेतृव अध्यक्ष डॉक्टर प्रवीण दरडे यांनी केले. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष डॉ.प्रकाश मगदम, महासचिव डॉ.ऋजुता गंगदरडे,महिला प्रतिनिधी डॉ.मंगल पाटील, डॉक्टर मेहेक सैनी, डॉ. ओशिन रामटेके, डॉ.दिपथी कावेरी, डॉ. सोमा सुंदरी, डॉ. सोनाली सातपुते, डॉ. शरद बुरुंगले,डॉ. मुडे, डॉ. नाहीद सय्यद, डॉ. प्रियंका, डॉ. पल्लवी रेड्डी, डॉ. प्रशांत, डॉ. प्राजक्ता लडके, डॉक्टर भावेश, डॉ. इंद्रजित कुमार, डॉ. अजय क्षीरसागर, डॉ.रोहित होरे, डॉ. वृषण जाधव, डॉ. अक्षय वाघमारे, डॉ. मृणाल निखाडे, डॉ.निहान गुप्ता, डॉ.रंजना बिगम, डॉ. सैशा, डॉ.सौरभ वाघमारे, डॉ. साई कोलसने
महिला काँग्रेस च्या उपाध्यक्षा शितल कातकर, सेवादल महिला काँग्रेस च्या शहर अध्यक्ष लता बारापात्रे, मंगला शीवरकर, काँग्रेस चे सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष मुन्ना तावाडे, इंजिनियर नरेंद्र डोंगरे यांची उपस्थिती होती.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!