Advertisements
Home चंद्रपूर गोंडपिंपरी केंद्रस्तरीय नाविण्यपूर्ण नवरत्न स्पर्धा भंगाराम तळोधी येथे संपन्न... विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास...

केंद्रस्तरीय नाविण्यपूर्ण नवरत्न स्पर्धा भंगाराम तळोधी येथे संपन्न… विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास चालना देणाऱ्या स्पर्धा-गटशिक्षणाधिकारी समाधान भसारकर

सिद्धार्थ दहागावकर (गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी)

Advertisements

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी निमित्य जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत केंद्रस्तरापासून तर जिल्हा स्तरापर्यंत अश्या नाविण्यपूर्ण नवरत्न स्पर्धाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते.भंगाराम तळोधी केंद्रांतर्गत “केंद्रस्तरीय नवरत्न स्पर्धांचे आयोजन” भंगाराम तळोधी शाळेत करण्यात आले.

या स्पर्धेच्या उदघाटन कार्यक्रमाप्रसंगी उदघाटक म्हणून सौ.लक्ष्मी बालुगवार सरपंच ग्रा. प.भंगाराम तळोधी तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री राकेश भाऊ कटकमवार अध्यक्ष शा.व्य.समिती भंगाराम तळोधी होते.विशेष अतिथी म्हणून श्री विजय पेरकावार उपाध्यक्ष शा.व्य.समिती तर प्रमुख पाहुणे म्हणून मालनताई धाबर्डे,श्री दुशांत निमकर केंद्रप्रमुख केंद्र भंगाराम तळोधी,सुधाकर मडावी मु अ भंगाराम तळोधी,तोषविनाथ झाडे मु.अ पारगाव,नानाजी मडावी मु.अ.सालेझरी,सुनील उईके मु.अ. पानोरा,मनोहर आंबोरकर मु. अ. सुपगाव,विनोद चांदेकर मु अ नंदवर्धन यांच्या उपस्थितीत पार पडले.

प्राथमिक विभाग (इयत्ता १ ते ५) कथाकथन स्पर्धा प्रथम समृद्धी बचाले,द्वितीय गणेश भोयर,स्वयंस्फूर्त भाषण स्पर्धा प्रथम क्रमांक आरोही चौथाले द्वितीय गणेश भोयर,वादविवाद स्पर्धा प्रथम क्रमांक समृद्धी बचाले,द्वितीय शिव कोत्तवार,भूमीकाभिनय स्पर्धा प्रथम कुंजन विरुटकर,द्वितीय राशी नागापुरे,स्वयंस्फूर्त लेखन स्पर्धा प्रथम सिद्धी पेरकावार, द्वितीय ईशान पोटे,बुद्धिमापन स्पर्धा प्रथम क्रमांक सिद्धी पेरकावार द्वितीय गणेश भोयर,सुंदर हस्ताक्षर स्पर्धा प्रणय झाडे,द्वितीय तृष्णा घोगरे,स्मरणशक्ती स्पर्धा प्रथम शिव कोत्तावार,द्वितीय पूर्वी कुडे तर उच्च प्राथमिक विभाग (इयत्ता ६ ते ८) कथाकथन स्पर्धेत प्रथम क्रमांक सानिका पोटे,द्वितीय दामिनी येलेकर,स्वयंस्फूर्त भाषण स्पर्धेत प्रथम क्रमांक गुलशन पोटे,द्वितीय क्रमांक मोनिका आत्राम, वादविवाद स्पर्धेत प्रथम नमन नागापुरे द्वितीय सरिता चौधरी, भूमीकाभिनय स्पर्धेत प्रथम चेतन वाकुडकर,द्वितीय समीक्षा भोयर,स्वयंस्फूर्त लेखन स्पर्धेत प्रथम श्रेयस हस्से,द्वितीय अर्पिता उंबरकर,बुद्धिमापन स्पर्धेत प्रथम क्रमांक स्वरा कत्रोजवार,द्वितीय सानिका कडतलवार,सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम प्रज्ञा उंबरकर,द्वितीय अनुराधा फुलमारे, स्मरणशक्ती स्पर्धेत प्रथम स्नेहा फलके, द्वितीय विश्रांती राजकोंडावार यांनी पटकावला.

विजेत्या स्पर्धकांना समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी मा.समाधान गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती गोंडपीपरी व अन्य मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.सदर स्पर्धेच्या विजेत्यांना सन्मानचिन्ह सुधीर सहारे,कांता निकुरे,श्रावण गुंडेट्टीवार,राजेश्वर अम्मावार
यांच्या सौजन्याने देण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाश झाडे तर आभारप्रदर्शन विकास झाडे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तानाजी अल्लीवार,अनिल चोखारे,आनंद मेश्राम,अरुण झगडकर, प्रणिता उईके मॅडम व केंद्रातील सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

प्रणालीने शालेय साहित्य वितरण करून साजरा केला वाढदिवस…

चंद्रपुर: आपला वाढदिवस हा केक कापून साजरा व्हावा असे प्रत्येकाला वाटते. त्यासाठी अनेकजण अवाढव्य खर्च करून आपला वाढदिवस साजरा करतात. परंतु प्रणाली दहागावकर या...

संत कोंडय्या महाराज जयंती यात्रा महोत्सव आजपासून सुरू…

सिद्धार्थ दहागावकर (गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी) धाबा:- आत्म्याचे ज्ञान , आत्मबोध प्राप्त करण्यकरिता अंतःकरणात अध्यात्म्याची जोड तेवत ठेवली पाहिजे, तर अज्ञानाचा अंधःकार दूर होऊ शकते. याकरिता...

ज्योती सावित्रीमाई यांचे विचारांचे वारस व्हा – डॉ अभिलाषा गावतुरे…

सिद्धार्थ दहागावकर (गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी) गोजोली तह गोंडपीपरी जि चंद्रपूर येथे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचे स्मारकाचे अनावरण सोहळा डॉक्टर अभिलाषा...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अभिनंदन! पुजा डोंगेची अखिल भारतीय आंतरविद्यापीठीय वूशू स्पर्धेसाठी निवड

चंद्रपूर (कोरपना) : नुकत्याच पार पडलेल्या गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या आंतर महाविद्यालयिन वूशू स्पर्धेत कवठाळा या छोट्याश्या गावातून कठीन परिश्रम घेत खेळाडू कु. पुजा गणपत...

गोंडवाना विद्यापीठ सभागृहाच्या “डीडोळकर’ नामकरणाला स्थगिती

: माजी मंत्री वडेट्टीवारांच्या पत्राची गंभीर दखल गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहाला स्व.दत्ता डिडोळकर नाव देउन आदिवासी समाजातील थोर हुतात्मे तथा आदिवासी समाजाच्या भावना दुखावणारा ठराव...

महिलांनी सक्रिय राजकारणात भाग घेऊन सत्याच्या बाजूने उभे व्हा : नम्रता ठेमस्कर

घुग्घूस : येथील तुकडोजी नगर वॉर्ड क्रं 06 येथे सौ. पदमा राजूरेड्डी यांच्या वतीने हळदी - कुंकू व वाण वाटप कार्यक्रम 28 जानेवारी रोजी...

व्यसनाधीन मद्यासक्ताच्या कुंटुबियांना आनंद व सुखाचे जीवन मिळावे यासाठी अँलअँनाॅन परिवार समुह करीत असलेले प्रयत्न समाजासाठी भूषणावह… -प्रा.शाम धोपटे

श्याम म्हाशाखेत्री (चंद्रपूर जिल्हा संपादक) चंद्रपूर- अँलअँनाॅन परिवार समुह या आंतरराष्ट्रीय संगतीचा भाग असलेल्या "सुप्रभात अँलअँनाॅन परिवार समुह चंद्रपूर येथे स्थापन होऊन चार वर्ष पूर्ण...

Recent Comments

Advertisements
Advertisements
Don`t copy text!