Homeनागपूरबार्टी तर्फे एकदिवसीय जिल्हास्तरीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन परिषद...

बार्टी तर्फे एकदिवसीय जिल्हास्तरीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन परिषद…

– दिनेश मंडपे ( कार्यकारी संपादक)

नागपूर: बार्टी, प्रादेशिक कार्यालय, नागपूर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन परिषद आयोजित करण्याचे आदेश दिनांक १९/०४/२०२२ ला मा. महासंचालक श्री. धम्मज्योती गजभिये यांचे आदेश प्राप्त झालेले आहे. विदर्भातील विशेषतः गोंदिया, गडचिरोली या आदिवासी बहुल जिल्ह्यातील विद्यार्थी प्रशिक्षण व अभ्यासाकरिता नागपूर शहरात वास्तव्यास असतात. त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे तसेच आर्थिक विवंचनेमुळे विविध अडचणीला सामोरे जावे लागते. त्यानुषंगाने बार्टी, प्रादेशिक कार्यालयामार्फत एकदिवसीय जिल्हास्तरीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन परिषद आयोजन १३ डिसे २०२२, मंगळवार रोजी आयोजित करण्यात आलेले आहे.

मगील दोन वर्षाच्या काळामध्ये कोरोनासारख्या महामारीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अश्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अश्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे मनौध्येर्य उंचावण्याकरीता नागपूर जिल्ह्यातील सावनेर, कुही, उमरेड, भिवापूर, पारशिवनी, काटोल, नरखेड, रामटेक, हिंगणा, कळमेश्वर व नागपुर ग्रामीण भागातील विविध वस्तीगृहातील तसेच विविध अभ्यासिका, शिकवणी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी हि परिषद उपयुक्त ठरेल. सदर कार्यशाळेकरीता महाराष्ट्रातील नामवंत मा. लीलाधर पाटील (मराठी व्याकरण व शब्द सामर्थ्य, दिपस्तंभ प्रकाशन, जळगाव) हे स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील नामवंत नाव असून त्यांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून लाखो विद्यार्थीवर्ग त्यांच्या शिकवणीचे अनुकरण करतात. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन मा. मुक्ता कोकडडे (जिल्हा परिषद अध्यक्ष) यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. धम्मज्योती गजभिये (मा. महासंचालक बार्टी पुणे), कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून मा. रुचा धाबर्डे (मुख्याधिकारी नगरपरिषद खापा) यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

कार्यालयामार्फत आयोजित या प्रशिक्षण मार्गदर्शनाचा विद्यार्थ्याना लाभ होईल व विद्यार्थ्यामध्ये स्पर्धा परीक्षा व त्यासंबधी असणारे विविध प्रश्न याचे समाधान या कार्यशाळेच्या माध्यमातून होईल. कार्यशाळेच्या आयोजनाकरिता प्रादेशिक कार्यालयातील श्री. तुषार सूर्यवंशी (प्रकल्प अधिकारी), हृदय गोडबोले (प्रकल्प अधिकारी), कु. शितल गडलिंग (प्रकल्प अधिकारी ) सुनील काकडे (का.स.), मंगेश चहांदे(का.स.) तसेच समतादूत यांचे विशेष सहकार्य आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!