Advertisements
Home चंद्रपूर गोंडपिंपरी गोंडपीपरी नगरीत २० नोव्हेंबरला रंगणार काव्यमैफिल...राज्यातील दिग्गज कवींची उपस्थिती आकर्षक ठरणार ......

गोंडपीपरी नगरीत २० नोव्हेंबरला रंगणार काव्यमैफिल…राज्यातील दिग्गज कवींची उपस्थिती आकर्षक ठरणार … कविसंमेलनाचे अध्यक्ष धनंजय साळवे तर उदघाटक सुधाकर अडबाले…

गोंडपीपरी:जीवन गौरव मासिक प्रणित जीवन गौरव साहित्य परिवार (म रा) व शब्दांकूर फाऊंडेशन,चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गोंडपीपरी सारख्या अतिशय दुर्गम भागात प्रथमच विदर्भस्तरीय मराठी काव्यसंमेलनाचे आयोजन दिनांक २० नोव्हेंबर २०२२ रोज रविवारला मा.उद्धव नारनवरे साहित्य मंच,धनोजे कुणबी समाज सभागृह,गोंडपीपरी येथे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisements

सदर कविसंमेलनाचे उदघाटक मा.सुधाकर अडबाले, सरकार्यवाह विदर्भ माध्य.शिक्षक संघ व कविसंमेलनाध्यक्ष धनंजय साळवे गटविकास अधिकारी,गडचिरोली विशेष अतिथी श्रीकृष्ण अर्जुनकर मु.का.अ.गृहलक्ष्मी महिला सहकारी पतसंस्था गडचिरोली, चेतनसिंह गौर नगरसेवक,राजेश ठाकूर सामाजिक कार्यकर्ते चामोर्शी,चेतन ठाकरे प्रवचनकार,गझलकार रज्जाक शेख,ग्रामीण कवी आनंदा साळवे अहमदनगर, लोककवी विजय ढाले,’दाखलखारीज’कार नरेशकुमार बोरीकर,सौ.रेखाताई कारेकर राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका,स्वागताध्यक्ष प्रा.संतोष बांदूरकर जनता कनिष्ठ महा.गोंडपीपरी यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.यात ज्येष्ठ साहित्यिक उद्धव नारनवरे यांना साहित्य सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे तसेच साहित्य लेखन गौरव पुरस्कार,पुस्तक प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे.या विदर्भस्तरीय कविसंमेलन तीन सत्रात पार पडणार असून पहिल्या सत्रात निमंत्रित कवींची व नंतर सहभागी कवींची काव्यमैफिल रंगणार आहे.

सर्व निमंत्रित व सहभागी कवी/कवयित्री यांना सन्मानचिन्ह,पुस्तक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.सदर संमेलनाचे सूत्रसंचालन अर्चना जिडकुंठावार,वंदना डगवार हे करणार आहे.या विदर्भस्तरीय मराठी कविसंमेलन यशस्वी करण्यासाठी गणेश कुंभारे,दुशांत निमकर यांच्या मार्गदर्शनात प्रा.भारत झाडे,उमेन्द्र बिसेन,अर्चना धोटे,संभाशिव गावंडे,वृषाली जोशी,तानाजी अल्लीवार यांच्या संयोजनात होणार आहे तसेच सदर कविसंमेलन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जीवन गौरव साहित्य परिवाराचे डॉ.हितेंद्र धोटे,विकास सुखधाने,विलास गजापुरे इत्यादी पदाधिकारी व शब्दांकूर फाऊंडेशनचे राजेश्वर अम्मावार,किशोर चलाख,राकेश शेंडे,सुशांत मुनगंटीवार,उज्वल त्रिनगरीवार,सूरज दहागावकर,देवानंद रामगिरकर,रेखा गायकवाड,राहुल पिंपळशेंडे,विनोद पोगुलवार,सुचिता जिरकुंठावार,गणेश पिंपळशेंडे,अक्षय उराडे,विनोद देवगडे,बळीराज निकोडे,नितीन चापले,नितेश चुनारकर,मुकेश पिंपळशेंडे, सचिन दळवी,नंदिनी पिंपळकर,अरुण कुत्तरमारे,शीतल अकोजवार,अश्रका कुमरे,अमृता पोटदुखे,रामेश्वर पातसे,दीपा राखावार,ऍड.रुपेश सूर,सुनील सातपुते,झुंगा कोरडे,सुदर्शन भोगेकर इत्यादी पदाधिकारी अथक परिश्रम घेत आहे.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

गोंडपिपरीतून आमदार सुभाष धोटेंना पुन्हा धक्का… नाराज रामचंद्र कुरवटकरांच्या भुमिकेने संकट वाढले

गोंडपिपरी- काँग्रेसचे जेष्ट नेते सुरेश चौधरी यांचे सूपूत्र राहूल चौधरी यांनी भाजपत प्रवेश केला.काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष राजीवसिंह चंदेल यांनी आमदार धोटेंवर निशाना साधत ते...

गोंडपीपरी तालुक्यातील तारसा खुर्द गावातील मृतक शांताराम भोयर यांच्या कुटुंबीयांना ४ लाखाची मदत… आमदार सुभाष धोटें यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण…

सिद्धार्थ दहागावकर (गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी) गोंडपिपरी :-- गोंडपिपरी तालुक्यातील मौजा तारसा येथील शांताराम भोयर हे नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. सदर घटनेची...

गोंडपिपरी तालुक्यातील गोजोलीच्या शेतक-याने केला आत्महत्याची प्रयत्न… उभ्या पिकावर अतिक्रमण काढण्याचा वनविभागाचा प्रयत्न…

गोंडपिपरी: तालुक्यातील गोजोली येथील साठ वर्षीय शेतक-याने आपल्या घरीच विष प्राशन करून जिवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला.शेतकरी गंभीर असून त्याला उपचारासाठी चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

आष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार

प्रितम गग्गुरी(उपसंपादक) आष्टी:- दिनांक २८ नोव्हेंबर रोजी श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टी तर्फे आयोजित द्वितीय विदर्भ स्तरीय आमंत्रित कराटे स्पर्धा आष्टी येथे आयोजित...

वंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…

नागपूर -भारतीय संविधानाला अभिप्रेत लोकशाही गणराज्य घडविण्यासाठी देशातील शेवटच्या वंचित समूहापर्यंत पोहोचून त्यांच्या वेदनेशी आपुलकीचे व माणुसकीचे नाते जोडावे लागेल. तेव्हा कुठे वंचित, शोषित,...

सावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…

सावली: गेल्या अनेक वर्षापासून गायरान जागेवर पिढ्यानपिढ्या पक्की घरे बांधून वास्तव्यास असलेल्या तसेच महसूल जमिनिवर अतिक्रमणं धारकांना अतिक्रमणं हटविण्याबाबत शासनाकडून नोटीस बजावण्यात आल्या. यामुळें...

सिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..

चंद्रपूर: मंडळवार, दि. 29 नोव्हेंबर 2022 ला धम्मनगरी चंद्रपुरात अनमोल बुद्ध धातूंची प्रतिष्ठाना धमकीर्ती विहारात करण्यात आली. या शुभप्रसंगी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सिद्धार्थ पंच...

Recent Comments

Advertisements
Advertisements
Don`t copy text!