Homeनागपूरतिरपुडे समाजकार्य महाविद्यालय (स्वायत्त) द्वारा आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन

तिरपुडे समाजकार्य महाविद्यालय (स्वायत्त) द्वारा आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन

दिनेश मंडपे
कार्यकारी संपादक

“माहिती तंत्रज्ञान, समाज माध्यमे : प्रभाव व आव्हाने”

नागपूर : तिरपुडे समाजकार्य महाविद्यालय (स्वायत) सदर नागपूर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर आणि महाराष्ट्र असोसिअशन  ऑफ सोशल वर्क एज्युकेटरर्स (मास्वे) यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय स्तरावर Information Technology and Social Media: Impact and Challenges परिसंवादाचे आयोजन विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सव कार्यक्रम अंतर्गत दिनांक 17 नोव्हेंबर 2022 गुरुवार रोजी रंजन सभागृह मातृसेवा संघ, सिताबर्डी, नागपूर येथे करण्यात आले आहे.
परिसंवादाचे उद्घाटन डॉ. सुभाष चौधरी कुलगुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर यांच्या शुभहस्ते होणार आहे. राष्ट्रीय परिसंवादाचे बिजभाषण हे मुक्ता चैतन्य, सुप्रसिध्द लेखिका पुणे करणार आहेत. उद्घाटन सत्राला युगांतर शिक्षण संस्थेचे सरचिटणीस श्री. गणेश गौरखेडे, मास्वे संघटनेचे अध्यक्ष डॉ. अंबादास मोहिते, तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयाच्या कार्यकारी प्राचार्या डॉ. स्वाती धर्माधिकारी उपस्थित राहणार आहे.
परिसंवादाचे प्रथम सत्रात डॉ. अशोक बागुल सहाय्यक आयुक्त पोलीस स्टेशन सोनेगाव संबोधित करणार आहे. या सत्रात समाज माध्यम आणि तत्रज्ञानाचा वापर करतांनाची सुरक्षितता यावर मार्गदर्शन करणार आहे. या सत्राला अध्यक्ष म्हणून डॉ. दिपक मसराम उपस्थित राहणार आहे.
MASTERSOFTERP नागपूर चे उपाध्यक्ष श्री. मुस्ताक अहमद हे  माहिती तंत्रज्ञान बाबत उद्बोधन करणार आहेत.
द्वितीय सत्रात समाज माध्यमांचा वर्तनावर होणारा परिणाम हा विषय डॉ. सुशील गावंडे प्रसिध्द मानसोपचार तज्ञ संबोधित करतील या सत्राची अध्यक्षता रिता अग्रवाल प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ भूषवतील.
समारोप सत्रात नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करणार आहे. समारोप कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून डॉ. अंबादास मोहिते मार्गदर्शन करणार आहे राष्ट्रीय परिसंवादामध्ये आंतर विद्याशाखेचे प्राध्यापक, स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. अशी माहिती परिसंवादाच्या निमंत्रक डॉ. शिल्पा पुराणिक यांनी दिली. परिसंवादाचे समन्वयक डॉ. सुनिर्मल कबिराज, सौ. पल्लवी जांभूळकर प्रा. सचिन हुंगे, प्रा. संजय फुलकर (मास्वे) चे सचिव डॉ. विलास घोडे (कोषाध्यक्ष मास्वे) दिनेश मंडपे आणि परिसंवाद आयोजन समितीशी इच्छुक व्यक्तींनी संपर्क साधावा.

संपर्क:
सौ. पल्लवी जांभूळकर    9763847716
      दिनेश मंडपे              8999558745

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!