टायगर ग्रुप व बजरंग दल यांच्या पुढाकाराने कत्तलीसाठी जाणाऱ्या ३२ गोवंशाना जीवनदान…

520

प्रितम गग्गुरी (गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी)

गडचिरोली:- आष्टी आलापल्ली मार्गाने काल एका ट्रक मध्ये गोवंश तस्करी करत असल्याची माहिती टायगर ग्रुप व बजरंग दल सदस्यांना  मिळाली लगेच सगळे एकत्रित येऊन सापळा रचले दरम्यान दुपारी 2 वाजता आष्टी येथे संशयित ट्रक (ए.पी२२-डब्लू २४६६) ला  अडवून ट्रकवर झाकलेली प्लास्टिक खुले करून बघितले असता त्यात जनावरांना कोंबून वाहतूक करत असल्याचे आढळले. सदर ग्रुपच्या सदस्यांनी एकत्र येत ही माहिती आष्टी पोलिसांना दिली. ट्रक मधल्या ३२ गोवंशान पैकी  १० मृत अवस्थेत होते त्यामुळे त्या मृत असलेल्या १० गोवंशाना टायगर ग्रुपच्या सदस्यांनी त्या मृत गायींचा अंतिम संस्कार केले व २२ गौवंशना चंद्रपूर येथील राधे कृष्ण गौशाला (प्यार रेस्क्यू शेलटर) येथे पोलीस कर्मचारी व टायगर ग्रूपचे पदाधिकारी स्वतः सोबत घेऊन गेले व त्या २२ गौवंशाना सुखरूप पणे गौशालेत सोडण्यात आले ll

उपस्थित टायगर ग्रूप आष्टी चे सदस्य पवन रामगिरकर, बजरंग दल चे सदस्य सचिन दहादे, अभिमन्यू मेश्राम,पिंकू बोरकुटे, शुभम पाडरमिसे, लोकेश चीपकर, राधे थेरकर , टायगर ग्रुप व बजरंग दलचे सदस्य उपस्थित होते.