Homeचंद्रपूरजिवतीजिवती तालुक्यातील आरोग्य केंद्रास वैधिकिय अधिकरी अवश्य द्या डॉक्टरअभावी रुग्णांचे होत...

जिवती तालुक्यातील आरोग्य केंद्रास वैधिकिय अधिकरी अवश्य द्या डॉक्टरअभावी रुग्णांचे होत आहे, बेहाल

 

बळीराम काळे, जिवती

जिवती :(ता.प्र.) चंद्रपूर जिल्हातील अतिदुर्गम व नकक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिवती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैधिकिय अधिकाऱ्याची कमतरता भासत आहे. डॉक्टरानअभावी ग्रामीण भागातून येणाऱ्या गरीब रुग्णांना नाहक त्रास सोसावा लागतो आहे.त्यामुळे या विषयात गांभिर्यपूर्वक लक्ष वेधून पुरेशा संख्येने डॉक्टर
प्राथमिक आरोग्य केंद्र जिवती,येथील रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात यावे.असे साकडे जिवती नगर पंचायतचे नगरसेवक तथा रायुकाँचे जिल्हा कार्याध्यक्ष अमर भाऊ राठोड, यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांना साकडे घातले आहे.
जिवती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणात रुग्ण सातत्याने येत असतात.दररोजच्या ओपिडी विभागात शकडो रुग्ण उपस्थित असतात.
मात्र गेल्या काही महीन्यांपासून जिवती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरानअभावी रुग्णांना अती त्रास सोसावा लागतो आहे.
डॉक्टरची संख्या कमी आहे.त्यात अनेक पदे रिक्त आहेत.परिणामी रुग्णांवर विपरीत परिणाम होतो आहे.रुग्णालयात एकही प्रस्तुतीतज्ञ डॉक्टर,उपलब्ध नसल्यामुळे खूपच वाईट परस्थिती निर्माण झाली आहे.जिवती प्राथमिक रुग्णालयात प्रस्तुतीतज्ञ डॉक्टरानअभावी,आजघडीला रुग्णांना गडचांदुर,चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जाण्याचा सला दिला जातो.
ही परिस्थिती अगदी दुखःद आहे.अनेकदा जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधूनही आजवर
डॉक्टर मिळाले नाहीत.या रुग्णालयात एकही डॉक्टर रात्रीच्या डीवट्टीला हजर राहत नसल्याने, अशातच एक येल्लापूर येथील एम्रजंसी पेशंट (रुग्ण) निधार्थ जीवने या यंग युवकाचा आरोग्य केंद्रात तडफडून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. म्हणून तालुक्याच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या तसेच शहरातीलही रुग्णांच्या जीवाशी होणारा खेळात बद्दल झाला पाहिजे.अशी मागणी अमर भाऊ राठोड यांनी केली आहे.जर का, हापत्याभरात प्राथमिक आरोग्य केंद्र जिवती, तालुका येथे डॉक्टर त्वरीत उपलब्ध न झाल्यास,जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही अमर राठोड यांनी दिला आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!