Homeचंद्रपूरजिवतीसार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता यास लाचलुचपत विभागाच्या वतीने रंगेहात अटक

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता यास लाचलुचपत विभागाच्या वतीने रंगेहात अटक

 

कनिष्ठ अभियंता यास २ लाखाची लाच घेता रंगेहात

जिवती : (ता.प्रतिनिधी) तालुक्यातील जिवती शहरांमधील प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत सर्वच आर.सी.एल.डब्ल्यू.ई या केंद्रसरकारच्या योजने अंतर्गत “मुंगसाजी कॅट्रक्शन कंपनी, यवतमाळ यांच्या माध्यमातून पुल बांधणीचे काम चालू असतांना, कंत्राटदरांकडून जिवती तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता अनिल शिंदे यांनी २ लाख रुपयांची लाच कंत्राटदार यास मागितली होती.परंतु कंत्राटदार / तक्रारदार यांनी मागील वर्षी सप्टेंबर ,ऑक्टोबर रोजी मागील महिन्यामध्ये आर.सी.एल.डब्ल्यू.ई या केंद्रसरकारच्या योजने अंतर्गत “मुंगसाजी कॅट्रक्शन कंपनी,यवतमाळ यांनी सदर तक्रारदारानी पुल बांधणीचे काम पूर्ण केले असून, केलेल्या पुल बांधणीच्या कामाचे निरीक्षण कनिष्ठ अभियंता अनिल शिंदे यांच्याकडून करण्यात आले होते.
कंत्राटदार यांनी केलेल्या कामाचे संपूर्ण कामाचे अंधाजे किंमत १कोटी रुपयांचे एकूण ४ बिल असून सदर ४ बिलापैकी २ बिल तयार करून मंजुर करणेकरिता सार्वजनिक बांधकाम विभाग चंद्रपूर,येथे पाठवणेकरिता अनिल शिंदे यांनी २ लाख रुपये यांची अनिल रक्कमेची लाच मागितली होती. परंतु कंत्राटदार जगणाथ शिंदे,कनिष्ठ अभियंता(वर्ग २)
सार्वजनिक बांधकाम उपविभाग जिवती,जि.चंद्रपूर
यांना २ लाख रुपये, लाच रक्कम देण्याची मनस्थिती नसल्याने कनिष्ठ अभियंता अनिल शिंदे यांच्या विरुद्ध लाप्रवी.कार्यालय चंद्रपूर, येथे दि.०७/०६/२०२२ रोजी तक्रार दिली होती.
प्राप्त तक्रारीवरून दि.०८/०६/२०२२ रोजी केलेल्या पडताळणी कार्यवाही मध्ये तक्रारदार यांचेकडे २ लाख रुपये मागणी करून तक्रारदार यांचे बील मंजुर केल्यानंतर,स्विकारण्याची तयारी दर्शविल्याचे स्पषट झाले.त्यावरून आज दिनांक ०१/११/२०२२ रोजी साफळा कार्यवाही दरम्यान कनिष्ठ अभियंता अनिल जगन्नाथ शिंदे, यांनी पंचासमक्ष लाच रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले.
सदर कार्यवाही विशाल गायकवाड,पोलीस अधीक्षक,ला.प्र.वी.नागापूर.यांचे मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक,अविनाश भामरे,लाप्रवी.विभाग चंद्रपूर,पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे,तसेच कार्यालयीन स्टॉफ सफौ,रमेश दुपारे,नापोकॉ,रोशन चांदेकर, नरेशकुमार नंन्नावरे,पोकॉ,रविकुमार ढेंगळे,वैभव गाडगे,अमोल सिडाम,राकेश जांभूळकर,
मपोकॉ,मेघा मोहुर्ले,पुष्पा कचोळे व चापोका हाके यांनी यशस्वी पार पडली आहे.
यापुढे जनतेला कोणताही लाचखोर अधिकारी व कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने कोणता खाजगी इसम लाचेची मागणी करीत असेल तर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
असे आव्हान करण्यात येत आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!