HomeBreaking Newsस्वराज्य फाउंडेशन आलापल्ली च्या पुढाकाराने रक्ताचा पुरवठा.. गर्भवती महिलेस मिळाले दुर्मिळ...

स्वराज्य फाउंडेशन आलापल्ली च्या पुढाकाराने रक्ताचा पुरवठा.. गर्भवती महिलेस मिळाले दुर्मिळ ‘O’ निगेटिव रक्तगट

प्रितम गग्गुरी(जिल्हा प्रतिनिधी)

अहेरी: तालुक्यातील चीना वट्रा या गावातील यशोदा पुलूरवार या महिलेला अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रसुती करण्याकरीता दाखल करण्यात आले. मात्र या गर्भवती महिलेची प्रकृती प्रसूतीकरीता स्थिर नव्हती. त्यांना रक्ताची नितांत गरज आहे असे तेथील डॉक्टरनी सल्ला दिला.परंतु त्यांना लागणारे रक्तगट हे अत्यंत दुर्मिळ रक्तगट होते.

ओ निगेटिव्ह रक्तगट सहजरित्या मिळणे कठीण होते. दुर्मिळ रक्तगट मिळत नसल्याने ती अक्षरशः मृत्यूच्या दारात पोहचली होती. परिवारातील सदस्यानी अनेक प्रयत्न केले मात्र त्यांना रक्तदाता मिळाले नाही. याविषयी माहिती परिसरातील लोकांनी स्वराज्य फाउंडेशनला दिले व गर्भवती महिलेला रक्ताची गरज आहे हे ऐकल्यावर स्वराज्य फाउंडेशननी हा विषय गांभीर्याने घेऊन लगेच सोशल मीडिया व प्रत्यक्षात भेटी घेऊन रक्तदाता शोधायला सुरवात केले.

काही वेळातच त्यांचा प्रयत्नांना यश आले व दुर्मिड रक्तगट असलेले राज गौरकर (वेंकटापूर) रक्तदाता देवाच्या रुपात मिळाले. लगेच रक्तदात्याला सोबत घेऊन स्वराज्य फाउंडेशनचे सदस्य उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे गेले. स्वराज्य फाउंडेशन व ऐनसिसी ग्रुपचे पुलूरवार परिवाराने विशेष आभार मानले असेच सहकार्य नेहमी करत राहण्याकरिता आशीर्वाद दिले…

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!