चंद्रपूर मधील काही गुत्तेदारांनी अधिकाऱ्याच्या काही अंतरावरच भ्रष्टाचाराचा कळस गाठलेला दिसत असून. चंद्रपूर मधील नेहरूनगर वार्ड नंबर 4 मध्ये व डी आर सी नंबर 4 या मेन रोडच्या बाजूने अमृत महोत्सवाची पाईपलाईन टाकण्यात आलेली होती. पाईपलाईन टाकत असताना रोड नंबर चार हा खोदण्यात आला होता. सदरील रोड खोदून पाईपलाईन ही पूर्ण काढल्यानंतर संबंधित गुतेदाराने खोदलेला रोड हा पूर्वपदावर आणणे आवश्यक असताना काही अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षणामुळे सदरील गुतेदाराने खोदलेल्या पाईपलाईन चा खड्डा व्यवस्थित न भरता काळी माती टाकून खड्डा बुजवण्याचे काम केले होते. कालांतराने पाऊस झाल्यामुळे रोडवरील पाणी त्या खड्ड्यामध्ये साचत असून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना त्याचा नाहाक त्रास सहन करावा लागत आहे.
संबंधित वार्डातील अथवा एरियामधील कार्यकर्त्यांना रस्त्याची काही देणेघेणे नसल्यासारखे वागत असून अधिकारी मात्र याकडे कानाडोळा करत असल्याचे पहावयास मिळत आहे.
काल दिनांक 27/09/2022 ला कृष्णा नगर येथील काही व्यक्तींनी स्वतः गाडी रोडच्या साईटला लावून हाताने माती टाकून खड्डे बुजवून शासनाला गांधीगिरी दाखवून दिली आहे.
तरीही मग्रूर राज्यकर्त्यांना याची काही जान पहचान राहिलेली नसून अधिकारी मात्र मूग गिळून गप्प आहेत.






