सिंदेवाही: युवक काँग्रेस प्रदेश सचिव शिवानी वडेट्टीवार यांच्या पुढाकारातून सिंदेवाही – लोनवाही महिला काँग्रेस कमेटीच्या वतीने गणेशोत्सवा दरम्यान घरगुती गणेशाची उत्कृष्ट गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा काँग्रेस नेते,आ. विजय वडेट्टीवार व किरनताई वडेट्टीवार यांच्या हस्ते नुकतेच पार पडले.
मागील दोन वर्षांच्या काळात कोरोना या महामारी संकटामुळे संपूर्ण गणेश भक्तांच्या आनंदात विरजण पडले होते. मात्र यंदाचे वर्षी कोरोना चा प्रभाव कमी झाल्यामुळे गणेश भक्तांमध्ये नवचैतन्याची लाट उसळली.भक्तांचा हा आनंद द्विगुणित करण्या हेतू महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव शिवानी वडेट्टीवार यांनी पुढाकार घेऊन महिला काँग्रेस कमेटीच्या वतीने सिंदेवाही – लोनवाही शहरात उत्कृष्ट घरगुती गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आयोजीत स्पर्धेत शहरांतील बहूसख्य स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. गणेशोत्सव दरम्यान ४ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर २०२२ या कालावधीत परीक्षक म्हणून कवडूजी मांडवकर, जयश्री वसाके, रजनी ठवकर यांनी परीक्षण करून उत्कृष्ट सजावटीचा निकाल जाहिर केला. यानुसार आज दि.२९ सप्टेंबर २०२२ रोजी देवयानी इंटरनॅशनल स्कूल येथे राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार व त्यांच्या पत्नी किरनताई विजय वडेट्टीवार यांच्या शुभ हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.
यावेळी प्रथम क्रमांक पटकावनाऱ्या निता विनायक परसावार यांना ७५०० रूपये रोख पारितोषिक, व्दितीय क्रमांक पटकावनाऱ्या कल्याणी अभिजित मुप्पिडवार यांना ५५०० रूपये रोख पारितोषिक, तर तृतीय क्रमांक श्वेता निखिल नागापुरे २५०० रूपये रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.या प्रसंगी प्रामुख्याने तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा सीमा सहारे, नगराध्यक्ष स्वप्नील कावळे, प्राचार्या शैलेजा पाटील, उपप्राचार्य निखिल टूकदेव, नगर पंचायत बांधकाम सभापती भास्कर नंनावार, व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.






