वर्धा नदीला चौथ्यांदा पुर… अडेगांव येथील शेतकऱ्यांना पुराचा जबर फटका…

589

शरद कुकुडकार
गोंडपिपरी ग्रामीण प्रतिनिधी

गोंडपिपरी: वर्धा नदीला चौथ्यांदा पूर आल्याने पुराचे पाणी शेतीपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आज दि. 13 सप्टेंबर रोजी गोंडपीपरी तालुक्यातील अडेगांव येथील नदी काठावरील पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांनी तिसऱ्यादा लागवड केलेल्या पिकाला पुराचा जबर फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी पुनश्च हवालदिल झाला आहे.

यंदा वरुणराजा चांगलाच बरसत आहे. शनिवार आणि रविवारला गोंडपिपरी तालुक्यात मुसळधार पाउस बरसला. त्यामुळे निम्न्न वर्धा, अपर वर्धा, इरई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले. त्यामुळे वर्धा नदीच्या पाण्याची पातळी वाढली असल्याने वर्धा नदीला पूर आला आहे.

या पुरामध्ये शेतात लागवड केलेले धान, सोयाबीन, कापूस , तूर मिरची यासह अन्य पिक पाण्या खाली आले आहे. मागील माहिन्यांत पुर आल्याने आधीची नुकसान भरपाई अजून मिळाली नाही. नुकसान भरपाई च्या प्रतिक्षेत शेतकरी असतानाच आता परत पुराचा फटका बसल्याने व शेतपीक पाण्याखाली आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.