बळीराम काळे,जिवती
जिवती (ता.प्र.) : तालुक्यातील मौजा शेडवाही (लांबोरी) येथील युवक शेतकरी नामे अनिल बारीकराव सोयाम (२२) हा आपल्या शेताकडे बकऱ्या चारत असताना दिनांक ०३ ऑगष्ट २०२२ ला अचानक विजाच्या गडगडाटासह जोरदार पाऊस बरसला. त्यात अंगावर वीज कोसळून अनिल सोयाम यांचा जागीच मृत्यू झाला.
सोयाम कुटुंबांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी याकरिता महेश देवकते, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री तथा माजी उपसभापती, पं.स.जिवती यांनी सोयाम कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी म्हणून सातत्याने पाठपुरावा केला याची शासनाने दखल घेत शासनातर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून अवघ्या बाराव्या दिवशी मृतक अनिल ची आई देऊबाई बारीकराव सोयाम याना प्रवीण चिडे, तहसीलदार, जिवती यांच्या हस्ते पंचासमक्ष चार लक्ष रुपयांचा धनादेश देण्यात आला.
यावेळी प्रवीण चिडे, तहसीलदार, महेश देवकते, माजी उपसभासपती,पं.स.जिवती, गोविंद टोकरे, निशांत मालेकर तलाठी, येल्लापूर उपस्थित होते. सोयाम परिवाराने शासनाचे तसेच महेश देवकते यांचे आभार मानले.