चंद्रपूर महानगर पालिकेच्या कार्य प्रणालीवर प्रश्नचिन्ह? चंद्रपुर शहरातील घनकचरा रस्त्यावर…

849

श्याम म्हशाखेत्री
जिल्हा संपादक, चंद्रपुर

चंद्रपुर: चंद्रपुर महानगरपालिका तर्फे घनकचरा व्यवस्थापन चुकीच्या पद्धतीने केल्या जात असल्याने सर्वसामान्य लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. चंद्रपुर शहरातील पठाणपुरा गेटच्या बाहेर शहरातील सर्व कचरा गोळा करून गेट बाहेरील आरवट रोड इथे आणून टाकल्या जात आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

शहरात सतत पाऊस सुरू असल्याने वारंवार नदीला पूर येतो आहे. हा रस्ता रहदारीचा असून या मार्गाने दररोज हजारो शाळकरी मुले, शासकीय, निमशासकीय कर्मचारी, सर्वसामान्य नागरिक ये जा करतात. मॉर्निंग वॉक सुरू असते.

परंतु चंद्रपुर महानगरपालिका तर्फे घनकचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने न केल्यामुळे रोगराई पसरू लागली आहे. सोबतच कचऱ्याची दुर्गंधी सर्वत्र पसरली आहे. त्यामुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व प्रकाराकडे चंद्रपुर महानगरपालिकेने लक्ष देवून त्वरित दुसरीकडे कचरा व्यवस्थापन करावे अशी सर्वसामान्य नागरिकाची मागणी आहे.