Homeगोंडपीपरीआमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते महसूल दिनानिमित्त कर्मचाऱ्यांचा सत्कार. मृतक निमगडे,...

आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते महसूल दिनानिमित्त कर्मचाऱ्यांचा सत्कार. मृतक निमगडे, निखाडे यांच्या कुटुंबियांचे केले सांत्वन.

गोंडपिपरी :– राज्यात १ ऑगस्ट रोजी दरवर्षी महसूल दिन म्हणून साजरा केला जातो. पंचायत समिती सभागृह गोंडपिपरी येथे महसूल दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महसूल दिन आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतनिमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. या कार्यक्रमात महसूल विभागातील अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे उत्तम कामगिरी बद्दल महसूल प्रशासनाच्या वतीने आमदार धोटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. या मध्ये महसूल विभागाचे मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, अवल कारकून, शिपाई यांचा समावेश आहे.

या प्रसंगी विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय डव्हळे, तहसीलदार के डी मेश्राम, नगराध्यक्षा सविता कुलमेथे, उपनगराध्यक्षा सारिका मडावी, सभापति कृ.उ.बा.स. सुरेश चौधरी, तालुकाध्यक्ष तुकाराम झाडे, महिला तालुकाध्यक्षा रेखा रामटेके, शहराध्यक्ष देवेंद्र बट्टे, कार्याध्यक्ष निलेश संगमवार, संभुजी येल्लेकर, सरपंच संघटनेचे अध्यक्ष देविदास सातपुते, नगर सेवक सुरेश चिलनकर, वनिता वाघाळे, वनिता देवगडे, रंजना रमगिरकार, शारदा गरपल्लिवार, राकेश पून, शालीक झाडे, महेंद्र कुनगाटकर, आशीर्वाद पिपरे, नायब तहसीलदार गेडाम, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, अवल कारकून, शिपाई व नागरिक उपस्थित होते.
या दरम्यान आमदार सुभाष धोटे यांनी गोंडपिपरी तालुक्यातील नैसरगिकदृष्टया वीज पडून मृत्यू पावलेल्या चेक बोरगाव येथील गुराखी धनराज निमगडे यांच्या कुटुंबाला भेटून सांत्वन केले तसेच आर्थिक मदत केली. शासना कडून लवकरात लवकर निमगडे कुटुंबियांना अर्थिक आणि सनुग्रही मदत निधी प्राप्त करून देऊ असे आश्वस्त केले. तसेच फुरडीहेटी येथील शेतरकरी काम करीत असताना वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे मृत्यू पावलेल्या अविनाश निखाडे या शेतकरी कुटुंबीयांची भेट घेवून सांत्वन केले आणि लवकरात लवकर वन विभगा मार्फत सानुग्रह निधी मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यासंदर्भात तहसीलदार आणि वनविभागाचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!