Homeचंद्रपूरकाळाच्या झडपेत निसंतान झालेल्या " वाघाडे दांपत्यांचे ' आ.वडेट्टीवारांकडून सांत्वन... भूमिपुत्रांने...

काळाच्या झडपेत निसंतान झालेल्या ” वाघाडे दांपत्यांचे ‘ आ.वडेट्टीवारांकडून सांत्वन… भूमिपुत्रांने कर्तव्य बजावले – व्यथा जाणून घेत दिली आर्थिक मदत

चंद्रपुर: गेल्या दहा दिवसात सर्वत्र धो -धो पडणाऱ्या पावसामुळे नदी नाल्यांना पुर येऊन चंद्रपूर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात पूर परिस्थिती निर्माण झाली. याचा फटका शेतकऱ्यांसह सामान्यांनाही चांगलाच बसला व यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अशा पुर सदृश्य परिस्थितीत गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथील साहिल वाघाडे याचा पूर परिस्थितीमुळे उपचारा अभावी दुर्दैवी अंत झाला. ही बाब राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या पूर परिस्थिती पाहणी दौरा दरम्यान शुक्रवारी लक्षात येताच क्षणाचाही विलंब न करता काळाच्या झडपेत निसंतान झालेल्या वाघाडे दांपत्यांची भेट घेऊन व्यथा जाणून घेत सांत्वन पर भेट देऊन आर्थिक मदत देत भूमिपुत्र असल्याचे कर्तव्य बजावले.

अतिशय संघर्षमय जीवनातून राजकीय क्षेत्रात कर्तुत्वाचा ठसा उमटविणारा नेता म्हणून काँग्रेसचे माजी कॅबिनेट मंत्री तथा आ. विजय वडेट्टीवार हे नाव सर्व दूर परिचित आहे. गोंडपीपरी तालुक्यातील मुळगाव करंजी हे आ. विजय वडेट्टीवार यांचे जन्मगाव होय. वडिलांचे छत्र हरपल्यानंतर जन्मभूमीचा त्याग करून आ. विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोली येथून राजकीय क्षेत्रात मुहूर्त मेढ केली. यानंतर राजकीय भवितव्यात कधी मागे वळून न पाहणारा नेता म्हणून त्यांचे राजकीय अस्तित्व उदयास आले. अशातच आ. वडेट्टीवार यांची महाविकास आघाडीच्या मागील सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री तथा चंद्रपूर जिल्हा पालकमंत्रीपदी वर्णी लागली. सत्तेत येतात एक सक्षम व कर्तबगार नेतृत्व म्हणून त्यांनी कोरोना या वैश्विक महामारी संकट काळात आपत्ती व्यवस्थापन खात्याची यशस्वीरित्या धुरा सांभाळून राज्यावरील संकटाशी लढा दिला. सोबतच संपूर्ण जिल्ह्यात विकास कामांचा झंजावातही सुरूच ठेवला. अडीच वर्षाच्या कालांतराने राज्यात सत्ता बदल होताच चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीने हाहाकार माजविला व नदी , नाल्यांना पूर येऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह , जनसामान्यांनाही पुराने हैराण करून सोडले. सत्ता खुर्ची गेली असली तरी जनसेवेच्या ऋणानुबंधाचा वसा अविरत सुरू ठेवत शेतकरी व जनसामान्यांच्या हाकेला धावून जात जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी करून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत असताना गोंडपिंपरी तालुक्यातील राजुरा विधानसभा क्षेत्र आमदार सुभाष धोटे यांचे सोबत पूर परिस्थितीचा आढावा घेत तोहोगाव येथे गेले असता साहिल काशिनाथ वाघाडे या तरुण मुलाच्या पूर सदृश्य परिस्थितीत उपचार अभावी दुर्दैवी अंताची मन सुन्न करणारी घटना कानावर पडली. तत्पूर्वी साहीलची बहिण हिचा देखील मृत्यू काही महिन्यांपूर्वी झाला. एकाच कुटुंबातील सलग दोन अपत्यांवर काळाचा आघात होऊन निसंतान झालेल्या वाघाडे कुटुंबियांची क्षणाचाही विलंब न करता त्वरित भेट घेऊन तालुक्याचा भूमिपुत्र या नात्याने आ. विजय वडेट्टीवार यांनी दुःखाच्या प्रसंगी वाघाडे दाम्पत्याचे सांत्वन करून व्यथा जाणून घेत आर्थिक मदत दिली. आजही राज्याच्या सत्ताकारणातील आ.विजय वडेट्टीवार हे कर्तुत्ववान नेतृत्वाची नाड जन्मभूमीच्या मातीशी जुडून असुन जन्मभूमी प्रति ऋणानुबंधाचे नाते हे कायम असतात याची प्रत्यक्ष अनुभूती नागरिकांना झाली.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!