Homeचंद्रपूरगोंडपिंपरीसकमुरचा शेतकरी ठरला एमएसईबीच्या निष्काळजीपणाचा बळी...चराईस नेलेले वासरू हाकलताना करंट लागून जागीच...

सकमुरचा शेतकरी ठरला एमएसईबीच्या निष्काळजीपणाचा बळी…चराईस नेलेले वासरू हाकलताना करंट लागून जागीच मृत्यू….गावकऱ्यांचा एमएसईबी विरोधात संताप;तात्काळ नुकसान भरपाईची मागणी…

गोंडपिपरी: शेतात चराई करता बैलासोबत नेलेले वासरू हाकलत असताना जमिनीवर कोसळलेल्या इलेक्ट्रिक मोटार पंपाच्या विद्युत पुरवठा करिता उभारलेल्या खांबातून प्रवाहित असलेल्या विद्युत प्रवाहाचा शाक लागून सकमूर येथील शेतकरी राजेश्वर तोहगावकर (59) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तीन वाजता दरम्यान उघडकीस आल्याने गावात खळबळ उडाली आहे .

मागील दहा दिवसांपासून धाबा-सकमुर परिसरात संततधार पाऊस बरसत आहे. या पावसामुळे वर्धा नदीला पूर आला असून सकमूर गावाशेजारचे नालेही भरून वाहत आहेत. संपर्क मार्ग बंद आहेत. गावकऱ्यांचे घराबाहेर पडणे बंद आहे. अशा परिस्थितीत मुख्य जनावरांची उपासमार होऊ नये म्हणून मोकळ्या शेतात सकाळी दहा वाजता दरम्यान राजेश्वर तोहोगावकर दोन बैल आणि एक वासरू चरावयास घेऊन गेले. चरत- चरत वासरू इलेक्ट्रिक मोटार पंपाला विद्युत प्रवाह पुरवण्याकरता उभारलेले जे खांब कोसळले होते त्याच्या तारांमधून विद्युत प्रवाह प्रवाहित होत असलेल्या ठिकाणाच्या बाजूला गेले. आडव्या पडलेल्या खांबाच्या तारांमध्ये विद्युत प्रवाह प्रवाहित नाही हे पक्के माहीत असल्यामुळे राजेश्वर तोहगावकर यांनी ताराच्या जवळ जाऊन वासराला हाकलण्याचा प्रयत्न केला. मात्र विद्युत प्रवाह चालू होता व जमीन ओली होती त्यामुळे करंट लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

शेजारी बैल चालणाऱ्या शेतकऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्याने दूरध्वनी द्वारे गावात संपर्क करून घडलेली घटना सांगितली आणि गावात एकच खळबळ उडाली. गावकऱ्यांनी धाबा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुशील धोकटे यांचेशी संपर्क केला व पोलिसांसह घटनास्थळ गाठले. व घटनेचा पंचनामा केला.

दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अशोक रेचनकर व गावकऱ्यांनी हा एमएसईबी कार्यालयाच्या निष्काळीपणामुळे झालेला मृत्यू असून एम एस ई बी ने मृतकाच्या कुटुंबियांना तात्काळ मदत करावी तरच आम्ही डेड बॉडी शवविच्छेदना करता नेऊ देणार अशी भूमिका घेतल्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. बातमी लिहीपर्यंत कोणताही तोडगा निघालेला नव्हता.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!