अतिवृष्टी व पुरामुळे शेतपिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या… भाजपा गोंडपिपरीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदाराना दिले निवेदन….

960

शरद कुकुडकार
भंगाराम तळोधी प्रतिनिधी

गोंडपीपरी : तालूक्यात मागील काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. नद्यांना पूर आल्याने शेत पिक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच मुसळधार पावसामुळे घर पडल्याने कुटूंबाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे मौका पंचनामा करून नुकसान ग्रस्तांना भरपाई देण्याची मागणी भाजपा गोंडपीपरी च्या वतीने करण्यात आली..

यासंदर्भात गोंडपीपरी तहसील दारानानिवेदन देण्यात आले आहे. यावेळी निवेदन देताना भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बबन निकोडे, तालुका व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष सुहास माडुरवार ,सरपंच निलेश पुलगमकार, व्यसनमुक्ती संघटनेचे अध्यक्ष गणपती चौधरी, गणेश डहाळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते