सकमूर गावामध्ये रानडुक्करांचा हाहाकार… रानडुक्कराच्या हल्लात बाप-लेक जखमी…

1259

सिद्धार्थ दहागावकर (गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी)

गोंडपिपरी: तालुक्यातील सकमुर गावालगत असलेल्या शेतशिवारात रानडुक्कराने कित्येक दिवसापासून आपला चांगलाच कहर माजवला आहे. गावातील नागरिकांना एकदिवसा पाठोपाठ रानडुक्कराच्या हल्ल्याचा सामना करावा लागत आहे.

आज शेळ्यांच्या कळपाला गावालगतच्या शिवारात चारायला नेले असता कुशाबराव मुंजनकर व त्यांचा लहान मुलगा सुमित कुशाबराव मुंजनकर या दोघा-बापलेकावर आज दुपारी 3:45 च्या सुमारास रानडुक्कराने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली असून त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे दाखल करण्यात आले आहे.

यापूर्वी गावातील दोन व्यक्तीवर रानडुक्कराने हल्ला करून जखमी केले होते. तेव्हा रानडुक्कराच्या बंदोबस्तासाठी वनविभागाला निवेदन देऊनही अद्यापही कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने वनविभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.