HomeBreaking Newsराज्य स्तरीय ॲबाकस स्पर्धेत सिंदेवाही चे विद्यार्थी चमकले... चौघांना चषक तर सहा...

राज्य स्तरीय ॲबाकस स्पर्धेत सिंदेवाही चे विद्यार्थी चमकले… चौघांना चषक तर सहा जणांना प्रोत्साहनात्मक पुरस्कार

सिंदेवाही:-स्मार्ट किड्स अब्याकस लर्निग प्रा. लिमिटेड, कोल्हापूर यांच्या वतीने नागपूर येथे 3 जुलै 2022 रोजी राज्यस्तरीय ॲबाकस स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते. ह्या नामांकित स्पर्धेत सिंदेवाही शहरातील स्नेहा गोहणे वाकुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली BRAINOPEDIA ABACUS INSTITUTE मधून 15 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यापैकी 4 विद्यार्थ्यांनी अवघ्या 5 मिनिटात 100 गणित सोडवून चषका चे मानकरी ठरले तर 6 विद्यार्थ्यांनी प्रोत्साहनत्मक बक्षिसे आणि 5 विद्यार्थ्यांनी सहभाग प्रमाणपत्र मिळवले.

सदर स्पर्धेत राम डीकेश्वर पर्वते ह्याने प्रथम व माहेश्वरी महादेव सोनटक्के, चैतन्य महादेव कोहले, विधी क्रीश्णा बोंद्रे या तिन्ही विद्यार्थ्यांनी द्वितीय पारितोषिक पटकावले. अरहान आश्विन बदनोरे, भार्गवी पवण मोहूर्ले, ओम पूनेश्वर डोंगरवार, रिद्धी बेनिराम ब्राह्मणकर, प्रणव प्रवीण खाडिलकर,वैदेही वेदांत मेहरकुरे ह्या विद्यार्थ्यांनी प्रोत्साहन पर पारितोषिक मिळवले. सानिका प्रवीण वर्गंटीवार ,मिहिका दीपक मेश्राम, नयन प्रमोद सुरणकर,रमा निखिल डांगे, सार्थक तानाजी बोरकर ह्यांनी सहभाग प्रमाणपत्र मिळवले.

5 मिनीटात 100 गणित सोडवून 4 विद्यार्थ्यांनी प्रथम स्रेनी व तीन विद्यार्थ्यांनी द्वितीय स्रेणीत यश मिळविले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई – वडील ,तसेच संस्थेचे मार्गदर्शक स्नेहागोहणे वाकुलकर ,तसेच कल्पतरू विद्यामंदिर सिंदेवाही चे डायरेक्टर श्री. धनंजय बंसोड सर ह्यांना दिले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!