Home चंद्रपूर ग्रामस्थांच्या समस्यांचा तात्काळ निपटारा करा- शिवानी वडेट्टीवार

ग्रामस्थांच्या समस्यांचा तात्काळ निपटारा करा- शिवानी वडेट्टीवार

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी मतदार संघात राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन तथा चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी विकासात्मक दूरदृष्टी कोनातून मोठ्या प्रमाणात विकास निधी मंजूर केला आहे. यात ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधणे हेतु बहुतांश विकास कामे पूर्णत्वास,प्रस्तावित तर काही प्रलंबित असल्याने विकास कामांची गती वाढवा अशा सूचना महाराष्ट्र राज्य प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधताना दिल्या.त्या ब्रह्मपुरी मतदार संघातील सिंदेवाही व ब्रह्मपुरी तालुक्यांत विविध विकासकामांच्या नुकतेच पार पडलेल्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

याप्रसंगी बोलताना युवक प्रदेश सचिव शिवानी वडेट्टीवार म्हणाल्या की , समृद्ध देशाचा मूळ कणा म्हणून ग्राम खेड्यांकडे बघितले जाते. ग्राम खेड्यांचा सर्वांगीण विकास म्हणजे देशाचा विकास होय. शहरांच्या प्रदूषण युक्त वातावरणापासून दूर असलेल्या बऱ्याच खेड्यांमध्ये रस्ते, वीज, पाणी, व पथदिवे या मूलभूत सुविधां चा आजही अभाव जाणवतो आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन तथा बहुजन कल्याण विभाग चंद्रपूर जिल्हा पालक मंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांनी महा विकास आघाडी सरकार सत्तेत येताच संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात विविध विकास कामांसाठी निधी खेचून आणला. अशातच कोरोणा या वैश्विक महामारी संकटाने संपूर्ण जग होरपळून निर्माण झालेल्या भयावह परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापन म्हणून मंत्री म्हणून धुरा सांभाळली व कोरोना शी यशस्वी लढाई लढली. ब्रह्मपुरी- सावली मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास निधी उपलब्ध झाला असून पुढील काळात उर्वरित विकास कामासाठी मुबलक निधी देण्यात येईल अशी ग्वाही देखील महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी दिली. शहर व ग्रामीण परिसरातही महिलांवर होणारे अत्याचार, त्यांना भेडसावणाऱ्या समस्या, उच्च प्रतीच्या आरोग्य सुविधा, शैक्षणिक व दळणवळणाच्या सुविधा व संपूर्ण सुरक्षित जीवनमान देण्याचा मानस असल्याचे पमानस शिवानी वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

यानंतर शिवानी वडेट्टीवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यामध्ये ब्रह्मपुरी- सावली मतदारसंघात प्रस्तावित असलेली विकासकामे, प्रलंबित विकासकामे यांना प्राधान्याने मंत्री महोदयांकडे मंजुरीसाठी प्रस्तावित करून आगामी पावसाळी हंगामात शेतकरी, शेतमजूर महिला, युवक व पुरुष आदी ग्रामस्थांच्या समस्यांचा तात्काळ निपटारा करावा अशा सूचना यावेळी बोलताना शिवानी वडेट्टीवार यांनी केल्या. याप्रसंगी प्रामुख्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता गावळ, शाखा अभियंता राठोड पालकमंत्री स्वीय सहाय्यक प्रदीप गद्देवार , तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमाकांत लोधे , महीला काँग्रेसच्या अध्यक्षा सिमा सहारे, ब्रह्मपुरी काँग्रेस तालुकाध्यक्ष खेमराज तिडके, महीला काँग्रेसच्या अध्यक्षा मंगला लोनबले , थानेश्वर कायरकर तसेच काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

महिला सक्षमीकरण व बळकटीकरणावर भर
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी जे मौल्यवान पाऊल उचलले त्यामुळे आज स्त्रियांना पुरुषां समान संधी मिळाली आहे. मात्र वाढत्या गुन्हेगारी व समाजातील काही मनोविकृती व्यक्तींनी स्त्री जातीला अबला नारी समजून पायाखाली तूडविण्याचा प्रयत्न चालविला आहे. अशा मनोविकृती वृतींना ठेसून काढण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्नशील असून काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडी सरकार महिला सक्षमीकरण व बळकटीकरण यावर अधिक भर देत आहे.
शिवानी विजय वडेट्टीवार
महाराष्ट्र राज्य प्रदेश युवक काँग्रेस सचिव

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी सत्तेसोबत राहणे गरजेचे – आ. किशोर जोरगेवार

चंद्रपुर: मागील अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकार सोबत राहुन मतदार संघातील प्रश्न सोडविण्यासह विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करता आला. याच दरम्याण घुग्घुस नगर परिषद...

अग्निपथ योजने विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन…

चंद्रपूर:- केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.मेहबूब भाई शेख यांच्या निर्देशानुसार चंद्रपूर येथे आंदोलन करण्यात आले. सदर...

20 जून रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन

चंद्रपूर : जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येतो. या महिन्याचा महिला लोकशाही दिन सोमवार, दि. 20 जून 2022 रोजी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

गोंडपिपरी तालुक्यात कृषी संजीवनी मोहीमेला प्रारंभ.. कृषी विभागाकडून प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन

शरद कुकुडकार (भंगाराम तळोधी प्रतिनिधी) भंगाराम तळोधी :- 25 जून ते 1 जूलै या दरम्यान राज्यात सर्वत्र कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात येत आहे याच धर्तीवर...

सकमुर गावामध्ये जंगली डुक्करांकडून माणसांवर होत आहेत हल्ले… निवेदन देऊनही वनविभागाचे दुर्लक्ष..

सिद्धार्थ दहागावकर (गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी) गोंडपिपरी: तालुक्यातील सकमुर या गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून जंगली डुकराच्या हैदोसामुळे गावातील नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. काही दिवसांपूर्वी अंकिता...

गोंडपिपरीत तालुक्यात कृषी संजीवनी मोहीमेला प्रारंभ… कृषी विभागाकडून प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन…

शरद कुकुडकार (भंगाराम तळोधी प्रतिनिधी) भंगाराम तळोधी :- 25 जून ते 1 जूलै या दरम्यान राज्यात सर्वत्र कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात येत आहे याच धर्तीवर...

अकोल्यातून गडचिरोली जिल्ह्यात नकली नोटा पोहचविण्याचा प्रयत्न

सिरोंचा : झटपट पैसे कमावण्याच्या नादात नकली नोटा चलनात आणण्यासाठी अकोला येथून घेऊन येणाऱ्या तीन आरोपींना तेलंगणातील महादेवपूर पोलिसांनी शनिवारी रंगेहाथ पकडले. यातील दोघे तेलंगणातील,...

Recent Comments

Don`t copy text!