Homeचंद्रपूरचंद्रपूरसह इतर विज उत्पादक जिल्ह्यांना 200 युनिट विज मोफत द्या...आमदार किशोर जोरगेवार...

चंद्रपूरसह इतर विज उत्पादक जिल्ह्यांना 200 युनिट विज मोफत द्या…आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेत केली मागणी…

चंद्रपूर: आज गुरुवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई येथील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली असुन चंद्रपूरसह इतर 8 कोळसा आधारित औष्णिक विद्युत निर्माते असलेल्या जिल्ह्यांना घरगुती वापरातील 200 युनिट विज मोफत देण्यात यावी अशी मागणी पुन्हा एकदा केली आहे. यावेळी सदर मागणी संदर्भात आमदार किशोर जोरगेवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यात सकारात्मक चर्चाही झाली आहे. या प्रसंगी खासदार अनिल देसाई, खासदार विनायक राऊत यांचीही उपस्थिती होती.
राज्यात मोठ्या प्रमाणात कोळसा आधारित विद्युत केंद्रातून वीज उत्पादन केले जाते. राज्यात सद्यस्थितीत 9 जिल्ह्यात कोळसा आधारित खाजगी तसेच शासकीय विद्युत केंद्र कार्यन्वित आहेत. यात चंद्रपूर, अकोला, बीड, जळगाव, नागपूर, ठाणे, नाशिक, रत्नागिरी व गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे. येथील कोळसा आधारित विद्युत केंद्रांमुळे दिवसागणिक येथील प्रदुषणात वाढ होत आहे. याचा मोठा विपरीत परिणाम येथिल नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे.
या प्रकल्पांमुळे प्रचंड प्रमाणात होणाऱ्या प्रदूषणाने नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील उष्ण तापमाणाची जागतिक पातळीवर नोंद घेण्यात आली आहे. या प्रदूषणाने कर्करोग, हदयरोग, अस्थमा, मानसिक विकार, श्वसनविकार या गंभीर आजाराचे रुग्ण या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. या आजाराच्या उपचाराकरिता लागणारा खर्च सर्व सामान्यांना परवडणारा नाही. या जिवघेण्या प्रदुषणामूळे नागरिकांचे आयुर्मान देखील सरासरीपेक्षा 5 ते 10 वर्षाने कमी होत असल्याचा तज्ञांचा अंदाज आहे.
त्यातच विज उत्पादक असुन सुध्दा येथील नागरिकांना 2 ते 3 रुपयात प्रति युनिट तयार होत असलेली विज 5 ते 15 रुपये प्रति युनिट प्रमाणे महागात विकत घ्यावी लागत आहे. हा येथील नागरिकांवर अन्याय आहे. त्यामुळे सदर जिल्ह्यांना विज उत्पादक जिल्हांचा विशेष दर्जा देत येथील नागरिकांना मोबदला म्हणून घरगुती वापरातील 200 युनिट विज मोफत देण्यात यावी अशी मागणी होत आहे. याची तात्काळ दखल घेत सदर जिल्हातील नागरिकांना 200 युनिट घरगुती वापरातील विज मोफत द्यावी अशी मागणी पून्हा एकदा आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेउन केली आहे. तसेच यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी विविध महत्वांच्या विषयांवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. सदर सर्व विषय मार्गी काढण्यासाठी लवकरच बैठीक लावण्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!