शरद कुकूडकार
भंगाराम तळोधी प्रतिनिधी
जवळपास एक महिन्यापासून हिवरा ते धाबा मार्गाच्या मुख्य रस्त्यावर हा भ्रांतचित्त इसम एका बाभळीच्या झाडाजवळ बसून राहत असायचा. तो डोक्याने विक्षिप्त असल्यामुळे जवळ झाड सोडून नुसता उन्हात राहायचा. येणारे-जाणारे त्या व्यक्तीकडे फक्त बघ्याची भूमिका घेऊन निघून जायचे परंतु, हिवरा येथील दत्तूभाऊ नावाच्या त्रीदेवी व्यक्तीला हे असह्य झालं आणि त्याचा वेश व त्याची घाणेरडेपणा व त्याचं उनात राहणं हे दत्तुभाऊ येलमुले यांना पहावल नाही आणि त्यांनी थेट स्वतःच्या हिरो होंडा मोटर बाईक वर त्याला बसवून आपल्या घरी आणले व घरच्या व्यक्तीसारखे त्याला आंघोळ घालून जेवण करवून आणि घरचे स्वच्छ कपडे घालून दिले आणि पुन्हा त्याला त्या बाभळीच्या झाडाखाली नेऊन दिले…
आज तो भ्रांतचित्त व्यक्ती घाणेरडा नाही तर एखाद्या अनोळखी गाव भुललेल्या व्यक्तिसारखा सुंदर व स्वच्छ दिसला….
अस पुण्याचं काम करणारे हे दत्तूभाऊ नावाचे (श्री.दत्तात्रय नानाजी येलमुले) व्यक्ती हिवरा गावातील सामाजिक कार्यकर्ते असून माजी पोलीस पाटील श्री.नानाजी पा. येलमुले यांचे थोरले चिरंजीव आहेत.दत्तू भाऊंचे गावभर कौतुक होत आहे.