Homeचंद्रपूरकोरपनाएसटी महामंडळ बसच्या धडकेत युवक ठार...गडचांदूर जवळील घटना...

एसटी महामंडळ बसच्या धडकेत युवक ठार…गडचांदूर जवळील घटना…

राजुरा: राजुरा कोरपना आदिलाबाद जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. 353 ब हा अपघात प्रवण महामार्ग झाला असून दोन दिवसांपूर्वी राजुरा येथील महिला प्राध्यापिका वनिता चिडे ह्यांचा याच महामार्गावर सोनुर्ली जवळ अपघात होऊन जागीच मृत्यू झाला होता. या घटनेची शाई वाळते न् वाळते तोच औद्योगिक नगरी गडचांदुर जवळ बसच्या धडकेत सोनुर्ली येथील 23 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली 

सविस्तर वृत्त असे की कोरपना करून गडचांदुरच्या दिशेने येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बस क्रमांक MH 13 CU 6339 या बसने गडचांडुर कडून सोनुर्ली च्या दिशेने जाणाऱ्या निखिल बंडु पत्रकार याला जोरदार धडक दिल्याने  निखिल जागीच कोसळला व त्याच्या डोक्यातून रक्तप्रवाह सुरू झाला. बस चालक वाहक व इतर नागरिकांनी त्याला तत्काळ दवाखान्यात दाखल करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली. गडचांदूर पोलिसांनी घटनस्थळाचा पंचनामा करून मर्ग दाखल केला असुन पुढील कारवाई सुरू आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!