Homeचंद्रपूरजिवतीदशवार्षिक सूक्ष्म नियोजन आराखड्यातून माराईपाटण चा होणार कायापालट.. १९ कोटींचा विकास...

दशवार्षिक सूक्ष्म नियोजन आराखड्यातून माराईपाटण चा होणार कायापालट.. १९ कोटींचा विकास आराखडा तयार ; पाच वर्षात होणार गाव समृद्ध

बळीराम काळे  जिवती प्रतिनिधी

जिवती : पंचायत समिती जिवती अंतर्गत माराईपाटण ग्राम पंचायतीची मनरेगा दशवार्षिक सूक्ष्म नियोजन आराखड्यासाठी निवड करण्यात आली असून ग्राम पंचायत माराईपाटण येथे दिनांक २६ एप्रिल,२०२२ ते २९ एप्रिल २०२२ या दरम्यान दशवार्षिक सूक्ष्म नियोजन आराखडा व शाश्वत विकासातून माराईपाटण ग्राम पंचायत अंतर्गत सर्व गावांचा चेहरा मोहरा बदलणार आहे.

विकास मेश्राम, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी,पं.स.चिमूर, राहुल घायवान, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी,पं.स.जिवती,पंचायत समिती अंतर्गत १७ रोजगार सेवक यांचा समावेश असलेल्या चमुने गावकऱ्यांच्या सहकार्याने १९ कोटी, ६२ लाख, ९१ हजार ७६७ रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला. आराखड्यानुसार ग्राम पंचायत माराईपाटण ला विकासासाठी दोन कोटी रुपये निधी दरवर्षी मिळणार आहे. त्यामूळे पाच वर्षात ग्राम पंचायत माराई पाटण अंतर्गत सर्व गावे समृद्ध होणार. ग्राम पंचायत माराई पाटण अंतर्गत माराईपाटण, वाडीगुडा,राहपली (बु) इत्यादी गावे येतात २०११ च्या जनगणने नुसार १०३४ एवढी लोकसंख्या आहे.

दशवार्षिक नियोजन आराखडा कार्यक्रमाअंतर्गत ग्राम पंचायत माराईपाटण व अंतर्गत गावात दिनांक २६ एप्रिल २०२२ ते २९ एप्रिल २०२२ या चार दिवस कार्यक्रम घेण्यात आले. पहिल्या दिवशी कार्यक्रमाचे उदघाटन श्रीहरी आस्कर, सहाय्यक गटविकास अधिकारी, यांचे हस्ते करण्यात आले यावेळी राजेंद्र बांबोळे, विस्तार अधिकारी (आरोग्य), श्रीरामे, विस्तार अधिकारी, (आरोग्य), राहुल सोनकांबळे, पोलीस पाटील व इतर गावकरी उपस्थित होते.

चार दिवसीय कार्यक्रमात ३६१ वर कुटुंबाचे सर्व्हेक्षण करण्यात आले. शिवार फेरी करण्यात आली त्यात माळरानामधील माथा ते पायथा कामाची निवड करण्यात आली. गाव फेरीही करण्यात आली. कुटुंबाच्या मागणीनुसार ३५ प्रकारच्या वैयक्तिक कामाची मागणी नोंदविण्यात आली. सकाळी शिवारफेरी व सायंकाळी गावफेरी व रात्रोला गाव सभा घेऊन मनरेगा गावकऱ्यांना माहिती देण्यात आली. चार दिवसीय कार्यक्रमा दरम्यान विजय पेंदाम यांनी भेट देऊन वेळोवेळी मार्गदर्शन केले.आराखड्यानुसार विकासकामे यशस्वी करण्यासाठी प्रशासनाच्या सर्व विभागाच्या अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी यांचा हातभार लागणार आहे. त्यामुळे तालुक्यातील माराईपाटण विकासाचे मॉडेल ठरणार आहे.
आराखड्यात सार्वजनिक कामामध्ये माथा ते पायथा मातींनाला बांध, नाला सरळीकरण, जलसंधारण, वनविभागाच्या जमिनीवर व पडीक जमिनीवर वृक्ष लागवड करणे, तलावातील गाळ काढणे, नाल्यांचे खोलीकरण करणे, सार्वजनिक गोडावून बांधकाम करणे. तसेच गुरांचा गोठा, सिंचन विहिर, फळबाग,शेळी पालन, शेळीचा गोठा, बांधावर वृक्ष लागवड, बंदिस्त नाली बांधकाम, सीमेंट रस्ते, सामूहिक शोषखड्डे, अंगणवाडी, शाळा यासाठी भौतिक विकासाची कामे अशा अनेक प्रकारच्या कामांचा समावेश आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!