केंद्र सरकारच्या वाढत्या इंधन दरवाढीचा निषेध…रमजान ईद व अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आज युवासेना बेलापूर विधानसभेतर्फे १२० दुचाकीस्वारांना मोफत १ लिटर पेट्रोल देऊन प्रतिकात्मक आंदोलन…

247

निखिल खरात (ठाणे जिल्हा प्रतिनिधी)

शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे, नगर विकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री नामदार श्री एकनाथजी शिंदे, शिवसेना उपनेते झोपडपट्टी सुधार मंडळ सभापती म्हाडा तसेच पर्यावरण समाजात प्राधिकरण महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष श्री विजय नाहटा, ठाणे लोकसभेचे लोकप्रिय खासदार श्री राजन विचारे साहेब तसेच युवासेना सचिव आणि कॉलेज कक्ष प्रमुख श्री वरूनजी सरदेसाई साहेब आणि युवासेना बेलापूर विधानसभेचे प्रथम विधानसभा अधिकारी श्री मयूर ब्रिद यांच्या मार्गदर्शनाखाली बेलापुर विधानसभेचे नवनियुक्त युवा अधिकारी निखिलजी मांडवे यांच्या मार्फत आज नवी मुंबई बेलापूर विधानसभा युवा सेनेच्या वतीने अक्षय तृतीया व रमजान ईद च्या मुहूर्तावर बेलापूर विधानसभेतील १२० नागरिकांना मोफत पेट्रोल भेट देऊन केंद्र सरकारच्या अनियंत्रित महागाई व इंधन दरवाढीच्या विरोधात प्रतिकात्मक निषेध युवासेना बेलापूर विधानसभेच्या वतीने करण्यात आला आहे. केंद्र शासनाने लवकरात लवकर पेट्रोल-डिझेलची इंधन दरवाढ कमी करण्याची मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

याप्रसंगी बेलापुर विधानसभेचे नवनियुक्त युवा अधिकारी निखिल मांडवे, बेलापूर विधानसभा सरचिटणीस तथा माजी नगरसेवक विशालजी ससाणे साहेब,उपविधानसभा युवा अधिकारी आशिष वास्कर, सिद्धाराम शिलवंत बेलापूर विधानसभेचे चिटणीस प्रवीण कांबळे साहेब, सतीश वाघमारे, समन्वयक सचिन कवडे साहेब, सुशिल सूर्वे साहेब, बेलापूर विधानसभा सोशल मीडिया अधिकारी साईनाथ वाघमारे, विक्रांत विग, विभाग अधिकारी अजित खताळ, विनायक धनावडे, स्वप्नील भिलारे, संकेत मोरे, तसेच युवासेना पदाधिकारी व युवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.