HomeBreaking Newsसुरजागड प्रकल्पात त्रिवेणीचा वाहनाचा धुमाकूळ सुरूच

सुरजागड प्रकल्पात त्रिवेणीचा वाहनाचा धुमाकूळ सुरूच

प्रितम गग्गुरी (अहेरी तालुका प्रतिनिधी)

आल्लापल्ली : गेल्या ४-६ महीण्यांपासुन सुरजागडचा लोहखणिज जलदगतीने पळवुन नेण्याचा त्रिवेणी कंपनीने घाटच घातला आहे. त्यासाठी वाहनांच्या मर्यादेपेक्षा जास्त कच्चा माल लादल्या जात आहे. त्यातल्या त्यात लवकरात लवकर जास्तीत जास्त माल लंपास करता यावा यासाठी वाहनांना वेगात माल नेण्याच्या अप्रत्यक्षरित्या सुचना दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे वाहनांचा तोल सुटणे रोजचाच भाग झाला आहे. आता हळुहळु अपघातांची तिव्रता सुध्दा वाढतच आहे. येणारा काळ अजुन किती भयंकर अपघात दाखविणार हे सांगता येत नाही. वेगाने माल पळवुन नेण्याच्या स्पर्धेत शहीद अजय मास्टे चौकात त्रिवेणीच्याच दोन वाहनांची धडक झाली.

शहीद अजय मास्टे चौकाच्या फलकावरुन ट्रक गेला. या भागातील तरुण जवान आपल्या परिसराच्या व देशाच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती दिली. परंतु त्या परिसराचीच सध्या लुट सुरु आहे. आता शहीदांच्या फलकाची अवहेलना सुध्दा हेच लुटारु करत आहेत अशी संतप्त भावना येथील नागरीक व्यक्त करीत आहेत.हा खेळ केव्हा थांबणार? की पुढे अजुन भयानक चित्र पाहायचे बाकी आहे काय? असे नाना प्रश्नवजा भीती जनमानसात निर्माण होत आहे. शहीदांची अवहेलना आता नागरीक सहन करण्याच्या मानसिकतेत दिसत नाहीत.

एटापल्लीत पुर्वी झालेल्या अपघातानंतर जनभावनेचा आदर करत वाहतुक थांबविण्यात आली होती.

आजही स्थानिकांना रोजगाराची व्यवस्था, मालवाहतुकीसाठी त्या क्षमतेचे रस्ते ह्या गरजा पुर्ण होत पर्यंत ऊत्खनन व वाहतुक पुर्णपणे थांबवायलाच पाहीजे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!