Home Breaking News पोलीस पाटील यांना विश्वासात न घेता शाळा व्यवस्थापन समिती गठीत.. जि....

पोलीस पाटील यांना विश्वासात न घेता शाळा व्यवस्थापन समिती गठीत.. जि. प. शाळा सिनाळा येथील प्रकार; पालकांमध्ये नाराजीचा सूर…

613

चंद्रपुर: जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सीनाळा इथे 1 मे रोजी नव्याने शाळा व्यवस्थापन समिती गठीत करण्याचे ठरविण्यात आले. या निवड प्रक्रियेविषयी नवीन समिती गठित करतांना सरपंच व पोलीस पाटील यांना माहिती देण्यात येत असते. परंतु यावेळी तसे न करता पोलीस पाटील यांना कोणतीही पूर्व सूचना देता व कोणत्याही प्रकारे लेखी माहिती न देता पोलीस पाटील यांना डावलण्यात आले. ह्या सर्व प्रकारामुळे पालकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

एकंदरीत गावपातळीवरील शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडणूकीच्या वेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक म्हणून पोलीस पाटील उपस्थित असणे आवश्यक असते आणि यासाठी शाळेने त्यांना पूर्वसूचना देणे गरजेचे होते. परंतु आज झालेल्या निवडणूकित पोलीस पाटील उपस्थित नसल्याने आज झालेली निवड प्रक्रिया समोर ढकलण्यात यावी व तिला स्थगिती देण्यात यावी असा सूर पालक वर्ग यांचे मधून निघत आहे.

असे न झाल्यास गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती चंद्रपुर व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परीषद, चंद्रपुर यांना लेखी स्वरूपात निवेदन देण्यात येईल असे पालक वर्गाकडून कळले आहे.

Don`t copy text!