टायगर ग्रुपच्या मदतीने ‘ती’ जाणार हँड टू हँड फाईट नॅशनल चॅम्पियनशीप साठी लखनऊला…

409

प्रितम गग्गुरी (अहेरी तालुका प्रतिनिधी)

आल्लापल्ली: कलकत्ता येथे झालेल्या किक बॉक्सिंग मध्ये लाहेरी येथील व राणी दुर्गावती शाळेतील विद्यार्थिनी कु.रेश्मा कोरसा हिने प्रथमच स्वर्ण पदक जिंकले व आता तिला लखनऊ मध्ये होणाऱ्या हँड टू हँड फाईट नॅशनल चॅम्पियनशीप करीता जायचं आहे. परंतु तिची आर्थिक परिस्तिथी हलाखीची असल्याने तिला जाणे शक्य नव्हते त्यात तिने टायगर ग्रुप च्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क केला व आर्थिक मदत मागितली व टायगर ग्रुप चे अध्यक्ष दौलत रामटेके, संचालक साई तुलसिगारी उपाध्यक्ष श्रीकांत जल्लेवार, सचिव आदर्शभाऊ केशनवार, कोषाध्यक्ष सागर रामगोणवर, रक्तसेवक कुणाल वर्धलवार, अनिकेत निमलवार, सूरज ईपावार, अक्षय वेलादी सर्व सदस्यांनी मिळून तिला आर्थिक मदत केली व यापुढे तिला आर्थिक मदत करणार असे सांगितले.