यवतमाळ : क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गेल्या दीड दशकांपासून यवतमाळ येथे समतापर्व आयोजित केले जाते.परिवर्तनवादी महामानवांच्या विचारांची रुजवात मुख्य प्रवाहापासून उपेक्षित घटकांमध्ये व्हावी हाच उदात्त हेतू समोर ठेवून समता पर्वाच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात.समाजोपयोगी उपक्रम व व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणाऱ्या स्पर्धांच्या माध्यमातून महामानवांना आदरांजली देण्यात येणार आहे.
ज्यात प्रामुख्याने संगीत,लेखन,वाचन,वक्तृत्व,वादविवाद यासारख्या पूरक स्पर्धांचा समावेश आहे.याचाच एक भाग म्हणून यावर्षी समता पर्व प्रतिष्ठाण तर्फे १० एप्रिल २०२२ रोजी राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन यवतमाळ स्थित “समता मैदान” येथे करण्यात आले आहे.स्पर्धा खुली असून सर्व वयोगटातील स्पर्धकांना भाग घेता येईल.स्पर्धा राज्यस्तरीय असल्याने महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील स्पर्धक यात भाग घेऊ शकतात.सदर काव्यवाचन स्पधेत १)आरक्षण व भारतीय संविधान २)युद्ध नको बुद्ध हवा ३)राजकारणाची बदलती दिशा व लोकशाही ४)स्त्री -जीवन व्यथा आणि व्यवस्था संघर्ष ५)ऑनलाइन शिक्षणप्रणाली- परिणाम, दुष्परिणाम” या विषयाला अनुलक्षून काव्यलेखन असावे.स्पर्धकांना तीन मिनिटांचा कालावधी सादरीकरणासाठी देण्यात येईल.
अनुक्रमे विजेत्या स्पर्धकांना सात हजार, पाच हजार, तीन हजार अशी प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाची आणि पाच प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येईल. स्पर्धेसाठी कविता दिनांक 5 एप्रिल पर्यंत पाठवण्यात याव्यात. नाव नोंदणी करण्याकरिता स्पर्धेचे मुख्य संयोजक आनंद देवगडे (9673357299) जयकुमार वानखेडे (7775875877)अतुलकुमार ढोणे(8329401288) दुशांत शेळके (8308236993) अक्षय गहूकार(7499214764) अर्चना वासेकर शेरजे(9404827925) वैशाली कोठेकर(9765065991) गिरीश खोब्रागडे(8263912741) स्नेहल सोनटक्के(8999699287) यांच्याशी संपर्क साधावा.
राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेसाठी राज्यातील बहुसंख्य कवी,गझलकारांनी सहभागी होण्याचे आवाहन समता पर्व २०२२ चे अध्यक्ष अॅड.रामदास राऊत व काव्यवाचन स्पर्धेच्या संयोजन समितीने केले आहे.






