आष्टी : आष्टी-आलपल्ली मार्गावर वळण घेत असताना आलापल्ली कडून भरधाव वेगाने येणाऱ्या MH 33 T 7399 क्रमांकाच्या टिप्पर ने MH 12 KY3715 क्रमांकाच्या कारला जोरधार धड़क दिली ही धडक इतकी जोरदार होती की, कार जवळपास 300 मी दूर फरफटत गेली होती. धडकेत कार मधील धर्मप्रकाश कुकुड़कर माजी जि. प. सदस्य, तुळशीराम कुकुडकर, सूरज कुकुडकर, गगन निमसरकर रा. अनखोडा ता चामोर्शी जि गडचिरोली हे 4 जन जखमी झाले होते. त्यांना आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
सदर टिप्पर चालक घटना स्थानावरुन पसार झाला होता. पण त्याला आष्टी फारेस्ट चेक नाक्यावर पकडण्यात आले असून चालक दशरथ प्रकाश लक्ष्मण चर्मकार रा. नैकिन ता रामपुर जिल्हा सिद्धि, उत्तरप्रदेश राज्यातला असून त्याला ताब्यात घेण्यात आले. आज त्याला चामोर्शी न्यायालयात हजर करण्यात आले असून सदर टिप्पर सुरजागड़ प्रकल्पात कार्यरत आहे। अधिक तपास पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या मार्गशनाखाली सुरु आहे.






