Homeनागपूरअंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज- निकेश पिने

अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज- निकेश पिने

दिनेश मंडपे 
नागपूर जिल्हा प्रतिनिधी

ऑरेज सिटी समाजकार्य महाविद्यालयद्वारे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत ग्रामीण विशेष शिबिराचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ग्राम निमतलाई, तालुका सावनेर येथे करण्यात आले आहे.

या सात दिवसीय शिबिरात महाविद्यालयाद्वारे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. रविवार दिनांक 13 मार्च रोजी “अंधश्रद्धा निर्मुलन प्रबोधन आणि प्रात्यक्षिक” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे निकेश पिने मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. समितीचा परिचय, समितीचे कार्य, वैज्ञानिक दृष्टीकोण व जादुटोणा विरोधी कायदा इत्यादी विषयी मार्गदर्शन केले. विविध प्रयोगाच्या माध्यमातून जगात कोणतीही जादू किंवा चमत्कार घडत नसून यामागे विज्ञानच आधार असतो.

पाण्याने दिवे पेटविणे, जळता कापूर खाने, कमंडल मध्ये भूत पकडणे, स्वर्गात जल पाठवणे, त्रिशूल जिभेत आरपार टाकून दाखवणे, नारळातून विविध वस्तू काढणे, हवेतून चैन काढून दाखवणे या सारखे विविध प्रयोग करून दाखवण्यात आले. जगात कोठेही भूत नसून ते मानवाने मानवाच्या डोक्यात वसवले आहे. कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता, आहे ती सत्य मानणे म्हणजे अंधश्रद्धा होय असे प्रतिपादन निकेश पिने यांनी केले.

यावेळी मंचावर गावातील सरपंच उज्वला लांजेवार, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. विजय तुपे, उद्योजक वक्ते जयदेव धांडे, सामाजिक कार्यकर्ते अंकित राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला मुले, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. कल्पना जामगडे कार्यक्रम अधिकारी यांनी प्रयत्न केले. दिनेश इसकापे यांनी सूत्र संचालन केले तर सोनम पंधरे यांनी आभार मानले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!