डॉ. बाबासाहेब कन्व्हेंशन सेंटर व शांतीवन चिचोली लवकर होणार प्रेक्षकांसाठी सज्ज

385

दिनेश मंडपे (नागपूर जिल्हा प्रतिनिधी)
नागपूर, दि. 3 : सामाजिक न्याय विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब कन्व्हेंशन सेंटर, व शांतीवन चिंचोली येथील बांधकाम लवकरच पुर्ण होणार असून ती ठिकाणे लवकरच प्रेक्षकांसाठी सज्ज करण्यात येणार असल्याचे समाज कल्याण आयुक्त डॅा. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले. नागपूर महानगर विकास प्राधिकरण येथील अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
सामाजिक न्याय विभागाअंतर्गत सुरु असलेल्या बांधकामाचा आढावा घेण्यासंदर्भात नागपूर विकास महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथील अधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

याबैठकीत डॉ. बाबासाहेब कन्व्हेंशन सेंटर व शांतीवन चिचोली येथील बांधकामासंदर्भात चर्चा करण्यात आली. बैठकी दरम्यान सुरु असलेल्या सर्व बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करुन देण्याबाबत आयुक्तांनी निर्देश दिले.
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अधिक्षक अभियंता डॉ.लीना उपाध्याय यांनी बाबासाहेब कन्व्हेंशन सेंटर चे काम पुर्णत्वास येत असून एप्रिल-2022 पर्यंत ते प्रेक्षकांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे सदर कामांबाबत माहिती देतांना सांगितले की, तसेच शांतीवन चिचोली येथील बांधकाम तयार झालेले असून सुशोभिकरणाचे काम सुरु असल्याचे सांगितले. आयुक्तांनी शांतीवन चिचोली येथ भेट देवून संस्थेचे पदाधिकारी नागपूर महानगर विकास प्राधिकरण नागपूर यांचेशी चर्चा करुन तेथील लवकरात लवकर पूर्ण करुन जनतेसाठी खुले करून देण्याचे निर्देश दिले. काही अडचण असल्यास शासनाशी पाठपुरावा करण्यात करावा, अशा सूचनाही केल्या.

समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, तसेच कार्यकारी अभियंता कल्पना ईखार, ना.म.प्र.वि.प्रा, प्रशांत भांडारकर, ना.म.प्र.वि.प्रा. संस्थेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.