HomeBreaking News२९ एकल कलाकारांच्या प्रस्ताव मंजूर... राज्य शासनाकडून मिळणार मदत

२९ एकल कलाकारांच्या प्रस्ताव मंजूर… राज्य शासनाकडून मिळणार मदत

दिनेश मंडपे (नागपूर जिल्हा प्रतिनिधी)

नागपूर दि. 0३ : देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने दीड वर्षापर्यंत कला सादरीकरण व त्यातून होणारे उत्पन्न यापासून वंचित असणाऱ्या २९ एकल कलाकारांना शासनामार्फत प्रत्येकी ५ हजाराची मदत मंजूर करण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत जिल्हा प्रशासनाने केला.
राज्यातील प्रयोगात्मक कलेतील केवळ कलेवर गुजराण असणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल कलाकारासाठी ही उपाययोजना शासनाने केली होती. पूर्णतः कलेवर अवलंबून असणारा कलाकार, ज्याचे वार्षिक उत्पन्न 48 हजाराच्या आत आहे. कलेच्या क्षेत्रात पंधरा वर्षांपासून जो कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्याचे 15 वर्षांपासून वास्तव्य आहे. अशाच कलाकारांची यासाठी निवड करण्यात आली.
केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या वृद्ध कलाकार मानधन योजनेतून मानधन घेणाऱ्या लाभार्थी कलाकारांना तसेच इतर वैयक्तिक शासकीय अर्थसह्याच्या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेतून लाभ दिला जात नाही.
या निकषात बसणाऱ्या 29 कलाकारांना रुपये पाच हजाराची प्रत्येकी मदत करण्यात आली आहे.राज्य शासनाने या संदर्भात जाहीर आदेश काढल्यानंतर व या संदर्भातील जाहिरात प्रकाशित झाल्यापासून दहा दिवसात कलाकारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले होते. जिल्ह्यातून वेगवेगळ्या तहसील कार्यालयात याबाबत कलाकारांनी अर्ज सादर केले होते. एकल कलाकार, व्यक्तिगत योजनेअंतर्गत यासाठी जिल्हास्तरीय एक समिती गठीत करण्यात आली होती. यामध्ये जिल्हाधिकारी अध्यक्ष असून जिल्हा परिषदेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी सदस्य सचिव आहेत. कला क्षेत्राशी निगडीत दहा सन्माननीय कलाकार या समितीवर असून त्यांच्या समक्ष याबाबतचा निर्णय घेण्यात आला. यावेळी आपण ज्या कलाक्षेत्रात आहोत त्या कलाक्षेत्रातील कार्यक्रमाचा अहवाल जोपासणाऱ्या, यासंबंधीचे पुरावे व्यवस्थित ठेवणाऱ्या तेरा तालुक्यातील 29 अर्जाला मंजुरी देण्यात आली.
000000

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!