Homeचंद्रपूरराजुरासिंधी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन...

सिंधी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन…

राकेश कडुकर राजूरा तालुका प्रतिनिधि

राजुरा तालुक्यातील सिंधी येथे 15 व्या वित्त आयोगाअंतर्गत पाणीपुरवठ्यासाठी नवीन ट्यूबवेल व वाल दुरुस्ती, 100% नळ कनेक्शन तसेच मानव विकास कार्यक्रम 2020-21 अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिंधी येथील भोजन कक्ष बांधकामाचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले.
*’गावाचा विकास हाच आमचा ध्यास ‘रामभाऊ ढुमणे उपसरपंच सिंधी* या ध्येयाने प्रेरित ग्रामपंचायत सिंधीच्या कार्यकारिणीच्या पाठपुराव्यातून नवीन ट्यूबवेल, व्हॉल्व दुरुस्ती, गावात शंभर टक्के नळ कनेक्शन तसेच मानव विकास कार्यक्रम 2020- 21 अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिंधी येथे विद्यार्थ्यांसाठी भोजन कक्षाचे बांधकाम या तीनही विकासकामांचे भूमिपूजन मा. मंगेश गुरनुले उपसभापती पंचायत समिती राजुरा, मा. सौ कुंदाताई जेणेकर माजी सभापती तथा सदस्य पंचायत समिती राजुरा, मा. राहुल चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक विरुर स्टे. मा. आबाजी पाटील ढुमणे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती राजुरा, मा. सौ. शोभाताई रायपल्ले सरपंच ग्रामपंचायत सिंधी, मा. रामभाऊ ढुमणे उपसरपंच ग्रामपंचायत सिंधी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
त्यासोबतच *मा. राहुल चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन विरुर स्टे.* यांच्या कार्याची दखल घेत ग्रामपंचायत सिंधी तर्फे त्यांचा शाल व श्रीफळ देऊन *सत्कार* करण्यात आला. त्या सोबतच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिंधी येथील विषय शिक्षिका *रंजीता चापले मॅडम या सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच NET मराठी विषयात उत्तीर्ण झाल्या. यासाठी ग्रामपंचायत सिंधी तर्फे त्यांचाही शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.


याप्रसंगी सपनाताई दामेलवर ग्रामपंचायत सदस्य सिंधी, सोनुबाई सिडाम ग्रामपंचायत सदस्य सिंधी, गिताबाई धानोरकर ग्रामपंचायत सदस्य सिंधी, सुनिताबाई धानोरकर पोलीस पाटील सिंधी, मंगेश रायपल्ले,राजू दामेलवार मधुकर धानोरकर, भास्कर मोरे, हेमंत दाते, ग्राम पंचायत कर्मचारी, जिल्हा प.उ.प्रा.शाळेतील सर्व शिक्षक आणि गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!