Homeनागपूरशिवरायांनी जगात पहिले लोकशाही राज्य घडविले-प्रा. जोगेंद्र कवाडे

शिवरायांनी जगात पहिले लोकशाही राज्य घडविले-प्रा. जोगेंद्र कवाडे

दिनेश मंडपे
नागपूर जिल्हा प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य म्हणजे शहाजीराजे व जिजाऊंचे विचार कृतीत आणून शिवकार्य करणारे होते. शिवाजीराजे हे जगातील आदर्श नेतृत्व करणारे तसेच जगातील उत्तम व्यवस्थांचे निर्माते आहेत. त्यांचे सामाजिक परिवर्तनाचे कार्य आजही प्रेरणादायक आहे. त्यांनी प्रत्यक्षात राजेशाही असतानाही तिचे रूपांतर लोकशाहीत करून एक आदर्श शासन व प्रशासन व्यवस्था तयार केली. म्हणजेच शिवाजी महाराजांचे राज्य लोकाभिमुख होते. जगाचा पोशिंदा म्हटला जाणारा बळीराजाला छत्रपतींनी स्वराज्यात सुखी ठेवले. म्हणजेच शिवरायांनी जगात पहिले लोकशाही राज्य घडविल्याचे प्रतिपादन लाॅंगमार्च प्रणेते तसेच पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांनी केले. ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 392 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी म्हणून बोलत होते. याप्रसंगी प्रा. जोगेंद्र कवाडे सर तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पुढे बोलतांना प्रा. जोगेंद्र कवाडे सर म्हणाले की, धार्मिक सहिष्णुता, रयतेप्रति कळवळा, कर्तव्यकठोर पण सर्वसामान्य व्यक्ती केंद्रस्थानी असणारी प्रशासकीय व्यवस्था, प्रजेसाठी धनधान्य वाटपापासून ते जल व्यवस्थापनापर्यंत सर्व गोष्टींची काळजी वाहणारी महसुली व्यवस्था ही शिवरायांच्या स्वराज्याची महत्त्वाची वैशिष्ट्ये होती. त्यांच्या लोकहितवादी कार्याचा आदर्श देशातील केंद्र सरकार व विविध राज्यात असलेल्या सरकारने घ्यावे, असेही प्रा. जोगेंद्र कवाडे सर म्हणाले.

लोकाभिमुख कार्य करणारा राजा – जयदीप कवाडे
छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा कोणत्याही व्यक्तिगत लाभासाठी नव्हता, तर तो परिवर्तनासाठी होता. सर्व मानवी अधिकार नाकारलेल्या जनतेला सन्मानाने जगता यावे यासाठी स्वराज्य पाहिजे होते. त्यामुळे रयतेच्या मानसिकतेत बदल करून राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील गुलामगिरी महाराजांनी मोडून काढली. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे समता, बंधुता स्थापित करून लोकाभिमुख कार्य करणारा राजा, असल्याचे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाड यांनी केले.

याप्रसंगी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जेष्ठ नेते ई. मो. नारनवरे गुरुजी, नागपूर शहर अध्यक्ष कैलाश बोंबले, महाराष्ट्र प्रदेश संघटक कपील लिंगायत, कामगार नेते शहर उपाध्यक्ष बाळूमामा कोसमकर, रमाई ब्रिगेडच्या नेत्या सौ. प्रतिमाताई जयदीप कवाडे, शहर संघटक तुषार चिकाटे, महामंत्री भगवानदास भोजवानी, उपाध्यक्ष प्रकाश मेश्राम, अजय चव्हाण, ओबीसी सेल शहराध्यक्ष विपीन गाडगीलवार व युवक आघाडी शहराध्यक्ष रोशन तेलरांधे,अजय चव्हाण, दिलीप पाटील, निळू भगत, भीमराव कळमकर, महिंद्र पावडे, अंकित डोंगरे, कुशीनारा सोमकुवर, अक्षय नानवटकर, गौतम गेडाम, उत्तम हुमणे, मनोज भोजने,प्रशांत तायडे,अमित तायडे,सुहास तिरपुडे,मोहन निंबाळकर, कमलेश मेश्राम, दौलत निंबाळकर,रामटेके गुरुजी,प्रणय मेश्राम, आकाश तेंभुणे,नयटिक बनसोड,सौ.पूनम मटके,कु.नीरज कवाडे, अस्मिता कवाडे सह शहरातील पदाधिकारी व कार्यकत्र्यांची उपस्थिती राहणार, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकातून दिली पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश संघटक कपील लिंगायत यांनी दिली.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!