वैनगंगा नदीच्या पुलावरील कठड्यांसाठी धरणे आंदोलन…मनसे, युवारंग, प्रहार ,माकपा, शिवसेना, वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्थेचा समावेश…

465

गडचिरोली (आरमोरी:)चक्रधर मेश्राम

नागपूर गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या वैनगंगा नदीच्या पुलावरील लावलेले लोखंडी पाईप रेलिंग २०२० मध्ये आलेल्या ऑगस्ट महिन्याच्या महापुरात वाहून गेले होते मा. जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी सदर विभागाला १९/१/२०२१ ला पत्राद्वारे सदर काम करण्याची सूचना दिली मात्र जिल्हाधिकारी यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करण्यात आले . वैनगंगा नदीवरील लावलेले लोखंडी पाइप रेलिंग दुरुस्ती न झाल्याने वैनगंगा नदीच्या पुलावर अपघात होऊन जीवित हानी होण्याची गंभीर परिस्थिती अजूनही कायम आहे . म्हणून मनसे, युवारंग, प्रहार ,माकपा, शिवसेना, वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्था,आरमोरी तर्फे वैनगंगा नदीवर धरणे आंदोलन आज दि.२/२/२०२२ ला दुपारी १:०० वाजता पासुन बेमुदत धरणे आंदोलनाची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाउपाध्यक्ष रणजित बनकर, युवारंग चे अध्यक्ष राहुल जुआरे, प्रहार सेवक निखिल धार्मिक, माकपा चे जिल्हा महासचिव अमोल मारकवार, युवारंग चे उपाध्यक्ष मनोज गेडाम ,शिवसेना तालुका अध्यक्ष महेंद्र भाऊ शेंडे, वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष देवानंद दुमाणे ,सचिव दीपक सोनकुसरे ,अंकुश गाढवे, युवारंग चे नेपचंद्र पेलणे, संघटक सुरज पडोळे, प्रशांत सोरते, करण गरमळे, जियाउल पठाण, मनसे चे आशुतोष गिरडकर, किशोर जंवजालकर सारडा चे संभावित मेश्राम उपस्थित होते.