Homeपुणेअश्लील शिवीगाळ देऊन , बिनधास्त सोशल मीडियावर धमकी देणाऱ्या 'थेरगाव क्वीन' ला...

अश्लील शिवीगाळ देऊन , बिनधास्त सोशल मीडियावर धमकी देणाऱ्या ‘थेरगाव क्वीन’ ला आखेर अटक

दिलीप सोनकांबळे प्रतिनिधी

पिंपरी (पुणे) : इन्टाग्रामवर अश्लील भाषा व शब्द वापरुन तयार केलेले व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या थेरगाव क्वीनसह तिघांवर वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोन जणांना अटक केली आहे.

साक्षी हेमंत श्रीश्रीमाळ (वय-18 रा. मातोश्री बिल्डींग, तीसरा मजला, पवार नगर थेरगांव, पुणे), साक्षी राकेश कश्यप (रा. लिंकरोड, चिंचवड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर कुणाल कांबळे (रा. गणेश पेठ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वाकड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक संगिता जिजाभाऊ गोडे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी इन्स्टाग्रामवर *Thergaon QueeN* या नावाने अकाउंट चालवनारी मुलगी साक्षी श्रीश्रीमळ हिने त्याच्या सोबत असणारा मुलगा कुणाल आणि एक मुलगी साक्षी कश्यम यांच्यासोबत मिळून सार्वजनिक ठिकाणी अश्लील भाषा व अश्लील शब्द वापरले. तसेच धमकीवजा व्हिडीओ तयार करुन ते इन्स्टाग्रामवर पोस्ट केले.

यामुळे समाजातील मुलामुलींचे नितिभ्रष्ट होण्यास व मानसिक स्थिती बिघडण्यास आरोपींची ही कृती कारणीभूत असल्याचा आरोप फिर्यादी यांनी तक्रारीत केला आहे. फिर्यादी यांच्या तक्रारीवरुन वाकड पोलिसांनी तिघांविरुद्ध भादवी कलम 292,294,506,34, माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 67 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

अटक केलेल्या थेरगाव क्विन साक्षी श्रीश्रीमाळ हिने आपल्याला पश्चाताप होत असून गुन्ह्याचे गांभीर्य माहित नसल्याची कबुली दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे 2 रामचंद्र घाडगे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 आनंद भोईटे सहायक पोलीस आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर पोलीस निरीक्षक गुन्हे संतोष पाटीलपोलीस निरीक्षक गुन्हे 2 रामचंद्र घाडगे सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव पोलीस उपनिरीक्षक गणेश तोरगल पोलीस अंमलदार दिपक भोसले, कल्पेश पाटील, अतीक शेख, विनायक म्हसकर यांच्या पथकाने केली.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!