Home Breaking News गोंडपिपरीचे नगराध्यक्षपद अनुसूचित जमातीकडे… काँग्रेसच्या सविता कुळमेथे नगराध्यक्ष होणार ….!

गोंडपिपरीचे नगराध्यक्षपद अनुसूचित जमातीकडे… काँग्रेसच्या सविता कुळमेथे नगराध्यक्ष होणार ….!

876

गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे)
गोंडपिपरी नगराध्यक्षाचे आरक्षण अनुसूचित जमातीसाठी (st) आरक्षित करण्यात आले.सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत असून त्या पक्षाच्या सौ सविता कुळमेथे या भावी नगराध्यक्ष असणार आहेत..!
गोंडपिपरी नगरपंचायतीत काँग्रेसचे सात उमेदवार विजयी झाले.बहुमतांसाठी ९ सदस्य लागतात. अपक्ष म्हणून निवडून आलेले सौ शारदा खेमदेव गरपल्लिवार आणी सुरेश चिलणकर हे सदस्य अधिकृतरीत्या काँग्रेसमध्ये गेले.म्हणजे काँग्रेसकडे एकूण ९ सदस्य झाले.बहुमतांसाठी हाच आकडा लागतो.आणी शिवसेनेनेहि काँग्रेसला पाठिंबा देऊ केला आहे.
एकूण काँग्रेसकडे १७पैकि ११ सदस्य संख्या आहे.अर्थातच सत्तेची सूत्रे काँग्रेसकडे असणार हे निश्चित.
काँग्रेसकडे अनुसूचित जमाती (st) प्रवर्गातील सौ सविता बबलू कुळमेथे या एकमेव सदस्यां आहेत.नगराध्यक्षपदी त्याचीच वर्णी लागेल हे (जवळपास) निश्चित आहे.

Don`t copy text!