HomeBreaking Newsसुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण?? ऋतूराज, जयराज हलगेकर सह...

सुरजागड प्रकल्पातील लॉयड्स मेटल्सच्या पदाधिकाऱ्यास बेदम मारहाण?? ऋतूराज, जयराज हलगेकर सह इतर ५ ते ६ लोकांवर अहेरी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल.

चक्रधर मेश्राम सहसंपादक गडचिरोली

सुरजागड : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह खनिज प्रकल्पाचे विविध प्रकारचे काम सांभाळणारे लाॅयडस् मेटल्स एन्ड एनर्जी लिमीटेड या कंपनीचे उपाध्यक्ष अतूल खाडीलकर यांना २४ जानेवारीच्या रात्री अहेरीचे आमदार तथा माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे जावई ऋतुराज हलगेकर, आणि त्यांचे बंधू जयराज हलगेकर यांचेसह इतर लोकांनी खाडीलकर यांचे आलापल्ली येथील राहते घरी जाऊन बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात अतूल खाडीलकर यांनी मंगळवारी अहेरी पोलीस स्टेशन येथे प्राथमिक तक्रार नोंदवली आहे. या मारहाणीच्या घटनेमुळे सुरजागड प्रकल्पासह गडचिरोली जिल्ह्यात फार मोठी खळबळ उडाली आहे.

पोलीस सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार अतूल खाडीलकर हे हलगेकर आणि त्यांच्या नातेवाईकासंदर्भात सहन न होण्यासारखे बोलले त्यामुळे संतप्त झालेल्या हलगेकरांनी आपल्या साथीदारांसमवेत खाडीलकरांच्या आलापल्ली येथील अस्थाई निवासस्थानावर जाऊन त्यांना मारहाण केली. खाडीलकरांच्या तक्रारीनंतर अहेरी पोलीसांनी ऋतुराज हलगेकर, जयराज हलगेकर, जे.डी. भोजराज व इतर जणांवर भादंवि चे कलम ४५२, ३२३, ४२७, १४३, १४७, ५०४ व ५०६ नुसार गुन्हा नोंदवला असून पूढील तपास अहेरीचे ठाणेदार शाम गव्हाणे हे करीत आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरजागड येथील लोहदगडाच्या वाहतुकीवरून, कामाला माणसे ठेवण्यावरून आणि आर्थिक देवाणघेवाणीवरून मागिल महिणाभरापासून वादविवाद व दबाव टाकून काम काढून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मात्र सदर उत्खनन व वाहतूकीच्या कामाचे सुसंचालन त्रिवेणी अर्थमुवर्स या कंपनीकडे असून सदर कंपनी कुणालाही वेगळ्या वाटेने जाऊ देत नसल्यामुळे अतिरीक्त मलाई लाटता येत नाही. यावर वेगळा मार्ग शोधून काही अतिरीक्त लाटण्याच्या प्रयत्नांना खाडीलकरांनी साथ दिली नाही त्यातून वादविवाद वाढले असल्याची खमंग चर्चा आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!