– गौरव लुटे आरमोरी तालुका प्रतिनिधी
जोगी साखरा -आज भारताचा ७३ वा प्रजासत्ताक दिन जानकाबाई कोल्हे कान्वेट येथे साजरा करण्यात आला. ग्रा.पं.सदस्य देवदास ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.ध्यजारोहन करताना गावचे प्रथम नागरिक संदीप भाऊ ठाकूर तसेच गावातील नागरिक व जानकाबाई कोल्हे कान्वेटचे मुख्यध्यापक प्रलोभ कोल्हे सर आणि सर्व शिक्षकवृंद प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी छोट्या मुलांनी इंग्लिशमध्ये आपला परिचय देवून सुंदर भाषण सादर केले.