HomeBreaking Newsकमलापूर हत्ती कॅम्प हलविण्याचा केंद्र सरकारला काय अधिकार.. आमदार धर्मराव बाबा...

कमलापूर हत्ती कॅम्प हलविण्याचा केंद्र सरकारला काय अधिकार.. आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे प्रश्न!

नागेश इटेकर,प्रतिनिधी

कमलापूर : अहेरी तालुक्यातील कमलापूर हत्तीकॅम्प मधील हत्तींना अंबाणीचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या गुजरात राज्यातील प्राणी संग्रहालयात हलविण्याचा प्रयत्न सुरू असताना अहेरी विधानसभेचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी कमलापूर येथील हत्तीकॅम्पला प्रत्यक्ष भेट देऊन येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करून पाहणी केली.कमलापूर हत्तीकॅम्प मधील हत्तींना अंबाणीचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या गुजरात राज्यातील प्राणी संग्रहालयात हलविण्याचा प्रयत्न सुरू असताना अहेरी विधानसभेचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी कमलापूर येथील हत्तीकॅम्पला प्रत्यक्ष भेट देऊन येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करून पाहणी केली.यावेळी त्यांनी हत्तीकॅम्प हे राज्य सरकारची मालमत्ता असून केंद्र सरकारचा काय अधिकार आहे? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

सिरोंचा वनविभागातील कमलापूर वन परिक्षेत्रातील हत्तीकॅम्प हे अहेरी विधानसभा क्षेत्रात येत असून जिल्ह्यातीलच नव्हेतर संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव पर्यटन क्षेत्र आहे. याठिकाणी आवश्यक निधी देऊन पर्यटन क्षेत्र वाढविण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करत असून त्याअनुषंगाने जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वाघांची चर्चा सुरू असताना मी स्वतःकमलापूर येथील हत्ती कॅम्प येथून का हलविणार आहे असा प्रश्न उपस्थित केला.

तेव्हा हत्ती कॅम्पमधून हत्तींना हलविले जाणार नसल्याचे वन विभागाने स्पष्ट केले.सध्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच वन खाते असून त्यांना आणि पर्यटन क्षेत्र वाढविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत आदित्य ठाकरे यांना सुद्धा निवेदन दिले आहे. याठिकाणी पर्यटन क्षेत्र विकसित झाल्यास स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यासाठी राज्यसरकार सकारात्मक असून हत्ती या ठिकाणाहून हलविले जाणार नाही, अशी ग्वाही आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली.

एवढेच नव्हेतर ही प्रॉपर्टी राज्य सरकारचा आणि कमलापूरवासीयांचा असून जेव्हापर्यंत कमलापूरवासीय परवानगी देणार नाही तेव्हापर्यंत हत्ती येथून हलविले जाणार नाही आणि मी असेपर्यंत हत्तीकॅम्प कमलापूरवरून हलविणे शक्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे परिसरातील नागरिक आणि वन्य प्रेमींनी कसलीही चिंता करू नये आणि सर्वांनी निश्चिंत राहावे असेही आवाहन केले.

यावेळी माजी जि.प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम तसेच वन परिक्षेत्र अधिकारी प्रमोद पझारे, वनरक्षक तसेच माहुवात चाराकटर उपस्थित होते.तसेच उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहेरी विधानसभा अध्यक्ष श्री लक्ष्मण येरावार,अहेरी पं.स.सदस्य श्री राकेश
पननेला,येरमणार चे माजी सरपंच श्री बालाजी गावडे, राजाराम चे माजी सरपंच श्री विनायक आलाम, कमलापूर चे माजी उपसरपंच श्री शंकर आत्राम,श्री मंताय्या आत्राम- ताटीगुडाम,श्री बाबुराव तोर्रेम दामरंचा,श्री तिरुपती कुळमेथे, जयराम आत्राम राजाराम, श्री अशोक आत्राम,श्री रंगा तलांडी- गोलाकर्जी,श्री सदु पेंदाम खांदला,श्री नारायण आत्राम पत्तीगाव,श्री विजय आंबिला रायगटटा,श्री लक्ष्मण झाडे मरनेल्ली,श्री रवी गावडे,श्री डोलू गावडे कोरेपल्ली,श्री लालचंद तलांडी कोडसेपल्ली,श्री लच्या आत्राम आसा,श्री हन्मंतु आलाम,श्री गंगाराम तोर्रेम भंगारामपेठा,सौ.अनिता आलाम, सौ.मंगला आत्राम राजाराम, कमलापूर, राजाराम, दामरंचा क्षेत्रातील शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!