सिंधी येथे रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ… खासदार बाळुभाऊ धानोरकर आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते भूमिपूजन

0
235

राजुरा (ता.प्र) :– प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत राजुरा तालुक्यातील मौजा सिंधीते विरुर स्टे-डोंगरगाव- पिंपळगाव पर्यंतच्या रस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण करणे, लांबी 11.55 किमी, अंदाजे किंमत ५६१.३९ लक्ष रुपये निधीच्या विकासकामांचे भूमिपूजन लोकप्रिय खासदार बाळुभाऊ धानोरकर आणि आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. मौजा सिंधी येथे या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करून शुभारंभ करण्यात आला. प्रास्ताविक करताना सिंधी ते विरुर रस्त्यावरील नाल्याच्या पुलाकरीता गावातील विविध विकास कामाकरीता निधी उपलब्ध करून देण्याकरिता उपसरपंच रामभाऊ ढुमणे यांनी मागणी केली… उद्घाटनप्रसंगी लोकप्रिय खासदार बाळुभाऊ धानोरकर यांनी पुलाचे अंदाज पत्रक झाले आहे त्याकरिता शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्याची गावातील विविध विकासकामे मार्गी लावण्याची हमी दिली…

या प्रसंगी माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, राजुरा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, कृ.उ.बा.स माजी सभापती आबाजी पाटील ढुमने, उपसभापती मंगेश गुरणुले, माजी सभापती तथा प स सदस्य कुंदाताई जेणेकर, विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष एजाज अहमद प स सदस्य तुकाराम मानुसमारे, प स सदस्य रामदास पुसाम,सरपंच शोभाताई रायपल्ले उपसरपंच रामभाऊ ढुमने, उपसरपंच विकास देवाळकर, पोलीस पाटील सुनीता धानोरकर, सरपंच रामभाऊ देवईकर इर्शाद शेख, उपसरपंच आकेश चोथले, राजु दामेलवार, मंगेश रायपल्ले, धनराज चिंचोलकर, राजकुमार ठाकूर, भास्कर मोरे, मधुकर धानोरकर, विनोद ढुमणे, श्रीधर पा. झुरमुरे, हेमंत दाते, गुणवंत मोरे, दाऊ ठेंगरे ,मावलीकर, बोबडे, यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व सिंधी येथील स्थानिक नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here