Home Breaking News कोविड-19 मध्ये उत्कृष्ट योगदानाबद्दल शिक्षकांचा सत्कार..

कोविड-19 मध्ये उत्कृष्ट योगदानाबद्दल शिक्षकांचा सत्कार..

505

चंद्रपूर: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा शिनाळा येथे कोविड -19 मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सर्वप्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला प्रतिष्ठित मान्यवरांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.त्यानंतर सामाजिक बांधिलकी जोपासत कोरोना सारख्या महामारीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन शाळा व्यवस्थापन समिती यांच्यामार्फत करण्यात आले.सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी मा. रोषणीताई खान सभापती महिला व बालकल्याण विभाग,जिल्हा परिषद चंद्रपूर,सरपंच सरिता नरुले,श्याम मशाखेत्री अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती,मार्गदर्शक म्हणून लाभलेले युवा व्याख्याते सिद्धार्थ चव्हाण, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व गावातील सर्व पालक वर्ग उपस्थित होते.

 

Don`t copy text!