HomeBreaking Newsकरुणा गावंडे -जांभुळकर यांची राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

करुणा गावंडे -जांभुळकर यांची राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

नागेश इटेकर, सहसंपादक

गोंडपिपरी : सुमतीबाई गोरे ट्रस्ट च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. त्यात जि. प.उच्च प्राथमिक शाळा आर्वी, पंचायत समिती राजुरा येशील शिक्षिका करुणा गावंडे- जांभुळकर यांची निवड झाली आहे.

सदर पुरस्कार सोहळा 16 जानेवारी 2022 ला पुणे येथील उद्यान कार्यालय सदाशिव पेठ -30 येथे ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले यांच्या प्रमुख उपस्थितीत व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. स्वतःतील गुणवत्तावाढ , सामाजिक व शैक्षणिक कार्यातील वेगळेपणा, साहित्यिक सहभाग व विद्यार्थी विकासातील वेगळे प्रयोग व प्रयत्न या निकषांच्या आधारे ही निवड करण्यात आली. राज्यभरातील एकूण 21 शिक्षकांची निवड समितीद्वारे करण्यात आली आहे. त्यात करुणा गावंडे – जांभुळकर यांचीही निवड झाल्याने यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!