तालुका पत्रकार संघाच्या वतीने गोंडपिपरी येथे पत्रकार दिन साजरा

0
198

सिद्धार्थ दहागावकर (गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी)

गोंडपीपरी: आज दि.6जानेवारी रोज गुरवारला तालुका पत्रकार संघाच्या वतीने गोंडपीपरी येथे पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
मराठी पत्रकारीतेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर
यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून तालुका पत्रकार संघाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
यावेळेस जेष्ठ पत्रकार संदीप रायपुरे, बाळू निंमगडे , अरुण वासलवार, राजकपूर भडके, समीर निंमगडे, रुजू झाडे,
,नितेश डोंगरे, प्रसेनजीत डोंगरे,नितीन पुद्दटवार,
प्रशांत कोसनकर, निलेश झाडे याची उपस्तिथी होती.
पत्रकार दिनाच्या औचित्याने राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रपूर चेजिल्ह्या उपाद्यक्ष महेंद्र सिह चंदेल यांनी तालुका पत्रकार संघाच्या पत्रकाराना दैनदिनी म्हणजेच डायरी भेट देत पत्रकाराना आपल्या लेखणीतुन आदर्श व निर्भीड विचाराचा वारसा देणाऱ्या पत्रकाराना शुभेच्छा दिल्या.
यावेळस राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका उपाद्यक्ष दामोदर गरपलीवार, भास्कर झाडे, प्रतीक पेड्डीलवार यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here